news

सोशल मीडियावर प्रसिद्धीस आलेल्या अंजलीला रुग्णालयात पाहून चाहत्यांना बसला धक्का…प्रेमाने मृत्यूलाही हरवता येत केलं सिद्ध

सोशल मीडियावर अनेकजण मजेशीर व्हिडीओ बनवून प्रसिद्धी मिळवत आहेत. अनेकांना या व्हिडिओच्या माध्यमातून चांगले पैसे सुद्धा मिळतात. खरं तर पैसे मिळवण्यासाठीचा एक मार्ग म्हणून अनेकजण या पर्यायाची निवड करतात. अर्थात जर तुमचे व्हिडीओ लोकांना आवडले तर लोक तुम्हाला निश्चितच फॉलो करतात. सोलापूर जिल्ह्यातील असेच एक जोडपं सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवत आहे. “अंजली बाई” या नावाने अंजली शिंदेचे इन्स्टग्रामवर अकाउंट आहे. अंजली दिसायलाही देखणी आहे आणि तिच्या अल्लड स्वभावामुळे आणि तिच्या मजेशीर व्हिडिओमुळे ती प्रसिद्धीस आली आहे. अंजली बाई ही आता तिच्या चाहत्यांमध्ये अंजली ताई म्हणूनच जास्त ओळखली जाते. पण ही हसती खेळती ताई अचानक अंथरुणाला खिळलेली पाहून तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. गेल्या दहा दिवसांपासून अंजलीने एकही व्हिडीओ सोशल मीडियावर टाकला नव्हता.

anjali bai anjali shinde photos
anjali bai anjali shinde photos

त्यानंतर मात्र हॉस्पिटलमध्ये अंथरुणाला खिळून असलेली अंजली अचानक व्हिडिओतून तिच्या चाहत्यांना भेटायला आली. अर्थात अंजलीला या संकटातून हसतं खेळतं ठेवणारा तिचा नवरा तिला या अवस्थेत पाहून पूर्ण हताश झाला होता. त्याच्या डोळ्यातून अश्रू दाटून आले होते मात्र आपले अश्रू पुसत तो अंजलीला ब्रेन ट्युमर झाला असल्याचे सांगतो. अंजलीकडे काहीच दिवस असल्याचे त्याला डॉक्टराने सांगितले होते. अंजली शिंदे ही तिच्या नवऱ्यासोबत सोलापूरला राहते. दोघांनाही आईवडील नाहीत. अशातच अंजलीला व्हिडीओ बनवण्याचा छंद लागला. यात तिला तिच्या नवऱ्याची साथ मिळाली. कुठलाही अंग विक्षिप्तपणा न करता हे दोघेही अनेक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करू लागले. अल्पावधीतच त्यांचा हा फॅन फॉलोअर्स २ लाख ३० हजारांच्या घरात जाऊन पोहोचला. दोन जीवांचा हा सुखी संसार चालू असतानाच त्यांच्या संसारात मोठे वादळ आले. अंजलीला ब्रेन ट्युमर झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. बाहेरच्या डॉक्टरांनी अंजली वाचणार नाही असे सांगितले आणि तिच्याकडे थोडेच दिवस आहेत असे सांगितल्यावर मात्र दोघांच्याही पायाखालची जमीनच सरकली. सोलापूर जिल्ह्यातील स्पर्श न्यूरो अँड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अंजलीला नेण्यात आले. तेव्हा ट्युमर वाढत असल्याने ताबडतोब ऑपरेशन करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. तीथल्या डॉक्टरांनी अंजलीवरचे हे मोठे संकट बाजूला केले.

anjali shinde social media star
anjali shinde social media star

अंजलीवर उपचार करण्यात आले असून ती हळूहळू आता रिकव्हर होत आहे. नवऱ्याच्या बोलण्याला ती प्रतिसाद देखील देत आहे. बेडवर झोपून हातवारे हलवणाऱ्या अंजलीचा हा व्हिडीओ पाहून चाहत्यांच्या काळजात चर्रर्र झालं आहे. आपली हसती खेळती ताई अचानक अशा अवस्थेत कशी काय गेली हे पाहून अनेकांना मोठा धक्काच बसला आहे. लोकांनी तिच्या उपचारासाठी आर्थिक मदतीचे हात पुढे केले आहेत तर अनेकांनी फोन नंबर देऊन कुठल्याची स्वरूपाची मदत करू असे म्हटले आहे. अंजलीवरचे हे संकट तूर्तास टळले आहे पण तिची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे त्यात तिच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी प्रार्थना करण्यात येत आहे. अंजली बाईचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बेडवर असलेली अंजली “मला सोडून देऊ नका” असे तिच्या नवऱ्याला म्हणत आहे. पण ” याच जन्मात काय तर पुढच्या जन्मात सुद्धा तुला सोडून देणार नाही” असे तो अंजलीचा हात हातात घेऊन आश्वासन देत आहे. प्रेमाने जग जिंकता येतं असं म्हणतात पण प्रेमाने मृत्यूलाही हरवता येतं हे या दोघांनी दाखवून दिलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button