serials

प्रथमच माय लेक एकत्र झळकणार स्पृहा जोशीच्या मालिकेत … वडीलही चला हवा येऊ द्या मधील प्रसिद्ध कलाकार

स्टार प्रवाह वाहिनीला टीआरपीच्या स्पर्धेत तगडी टक्कर देण्यासाठी झी मराठी वाहीनी आणि कलर्स मराठी वाहिनीने कंबर कसलेली पाहायला मिळत आहे. कारण गेल्या काही दिवसात झी मराठी वाहिनीने नवनवीन धाटणीच्या मालिका प्रेक्षकांच्या समोर आणल्या आहेत. याच जोडीला केदार शिंदे कलर्स मराठी वाहिनीचे हेड झाले आहेत त्यामुळे कलर्स मराठी वाहिनीचा टीआरपी वाढवण्यासाठी त्यांनी इंद्रायणी आणि सुख कळले या मालिका प्रेक्षकांच्या समोर आणल्या आहेत. दरम्यान इंद्रायणी मालिका प्रसारित झाली असून मालिकेला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर सुख कळले या मालिकेतून स्पृहा जोशी आणि सागर देशमुख पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहेत. या मालिकेचे दोन प्रोमो जाहीर करण्यात आले आहेत. येत्या २२ एप्रिल पासून मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

या मालिकेत अभिनेत्री स्वाती देवल पहिल्यांदाच तिच्या मुलासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. स्वाती देवल हिला तुम्ही ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत परीच्या मामीच्या भूमिकेत पाहिले होते. त्यानंतर ती राणी मी होणार या मालिकेत एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसली. पण आता सुख कळले या मालिकेतून ती मुलगा स्वराध्य सोबत एकत्र झळकणार आहे. अर्थात तिची भूमिका नेमकी काय असणार याचा उलगडा लवकरच होईल. स्वाती देवल ही चला हवा येऊ द्या फेम तुषार देवलची पत्नी आहे. गेली अनेक वर्षे हे दोघेही मराठी सृष्टीत कार्यरत आहेत. स्वातीला अभिनयाची आवड असून तुषार देवल हा संगीत दिग्दर्शक आहे. गेली १० वर्षे त्याने चला हवा येऊ द्या मध्ये संगीत दिग्दर्शनाचे काम समर्थपणे पेलले होते. चला हवा येऊ द्या मधून ब्रेक घेऊन त्याने अभिनव नगर बोरिवली येथे आयोजित केलेल्या मिसळ महोत्सवात सहभाग घेतला होता. ‘देवल मिसळ’ नावाने त्याने तिथे मिसळचा स्टॉल सुरू केला होता. त्यावेळी स्वातीनेही तुषारला हा स्टॉल उभारण्यासाठी पाठिंबा दर्शवला होता.

swati dewal with son SWARAADHY in sukha kalale serial
swati dewal with son SWARAADHY in sukha kalale serial

पण आता स्वातीला पुन्हा एकदा मालिकेत येण्याची संधी मिळाली आहे. स्वाती आणि तुषारचा मुलगा स्वराध्य हा दोघांचेही गुण हेरूनच जन्माला आला आहे असे म्हणायला हरकत नाही. कारण स्वराध्य उत्तम तबला वाजवतो. चला हवा येऊ द्या च्या मंचावर देखील त्याला पाहायला मिळालं होतं. लहान तोंडी मोठा घास मधून स्वराध्यने त्याच्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना हसवलं होतं. पण आता प्रथमच तो मालिकेतून काम करताना दिसणार आहे..त्यामुळे ही माय लेकाची जोडी एकत्रित पाहायला प्रेक्षक देखील तेवढेच उत्सुक असणार आहेत. स्वाती आणि स्वराध्य देवल या माय लेकाला एकत्रित झळकणाऱ्या या पहिल्यावहिल्या मलिकेसाठी खूप खूप शुभेच्छा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button