news

लिप फिलर मुळे बिघडलं सौंदर्य नाय ते करून बसली अन …उमा भेंडे यांची सून ट्रोल

‘लिप फिलर’ हा एक ट्रेंड बॉलिवूड सृष्टीला काही नवीन नाही. लिप फिलर मुळे ओठांचा आकार वाढवला जातो. पण बऱ्याचशा अभिनेत्रींना या मुळे ट्रोल व्हावे लागले आहे. कारण लिप फिलर प्रत्येकालाच सूट होईल असे नसते. राखी सावंत, अनुष्का शर्मा, आयेशा टाकिया, श्रीदेवी यांना तर लिप फिलरमुळे अक्षरशः तोंड लपवावे लागले होते. पण हाही एक अनुभव घ्यावा म्हणून मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री उमा भेंडे यांच्या सुनेने लिप फिलर ट्राय केलं आहे. उमा भेंडे या मराठी चित्रपट सृष्टीतील एक सोज्वळ नायिकेपैकी एक म्हणून ओळखल्या जातात. १९ जुलै २०१७ मध्ये त्यांनी या जगाचा निरोप घेतला. प्रसाद भेंडे आणि प्रसन्न भेंडे अशी दोन अपत्ये त्यांना आहेत. प्रसाद हा सिनेमॅटोग्राफर म्हणून ओळखला जातो.

uma bhende sun shweta mahadik
uma bhende sun shweta mahadik

तर श्वेता महाडिक ही त्यांची सून हिंदी मालिका तसेच मराठी चित्रपट अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. लोकमान्य या चित्रपटात ती प्रमुख भूमिकेत झळकली होती. मुलाच्या जन्मानंतर त्याचे नीट पालनपोषण व्हावे म्हणून श्वेताने अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला आहे. पण सोशल मीडियावर ती क्रिएटिव्ह आयडिया शेअर करत असते. श्वेताकडे क्रिएटिव्हिटीचे नॉलेज असल्याने पर्स, महागड्या इअर रिंग्ज, डिझायनर कपडे कमी खर्चात ती बनवून दाखवते. त्याचमुळे इन्स्टाग्रामवर तिचे ८ लाख ८४ हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत. श्वेताने आज सकाळीच लिप फिलर ट्राय करत असल्याचे सोशल मीडियावर म्हटले होते. ‘आजचा दिवस माझ्यासाठी खास आहे, तेवढीच उत्साही आणि चिंता पण वाटते. माझ्या चेहऱ्यावर काही फिलर्स करणार आहे ,लवकरच तुमच्यासमोर येईल’ असे तिने यावेळी म्हटले होते.

shweta mahadik lip
shweta mahadik lip

त्यानंतर काही वेळापूर्वीच तिने लिप फिलर केल्याचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले. श्वेता तिच्या चाहत्यांमध्ये कमालीची लोकप्रिय आहे पण असे लिप फिलर तिला शोभून दिसत नाही असे त्यांनी म्हटले आहे. तू छान दिसत होतीस, ह्याची काहीच गरज नव्हती, का? अशाही प्रतिक्रिया तिला मिळत आहेत. अर्थात हे नवीन काहितरी ट्राय करून पाहण्याच्या प्रयत्नात आपन आपले नैसर्गिक सौंदर्य गमावून बसतो असे तिला सल्ले मिळत आहेत. पण हे लिप फिलर अवघ्या वर्षभरातच पूर्ववत होत असल्याने एक असा वेगळा अनुभव घेण्याची तिची इच्छा आज तिने पूर्ण करून घेतली आहे असेच यातून म्हणावे लागेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button