डिसेंबर, जानेवारी महिन्यात शाळा कॉलेजेसमध्ये एनुअल डे साजरे केले जातात. आपल्या मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी असे सोहळे आयोजित करण्यात येत असतात. यातूनच मुलांचे कोणत्या क्षेत्राकडे जास्त ओढ आहे याची जाणीव त्यांच्या पालकांना होते. पण या सोहळ्यात तुम्हालाही तुमच्या मुलांसोबत स्टेजवर उतरण्याची संधी मिळाली तर तो दिवस तुमच्यासाठी खूपच खास ठरलेला असतो. असाच काहीसा अनुभव आज मराठी मालिका अभिनेत्याने घेतलेला आहे. हा अभिनेता म्हणजेच सुंदरा मनामध्ये भरली मालिका फेम अभ्या म्हणजेच अभिनेता समीर परांजपे होय. साची ही समीरची लेक आहे.
साची आता जवळपास तीन वर्षांची आहे नुकताच तिच्या शाळेत अँनुअल डे साजरा करण्यात आला. यावेळी साचीला तिच्या बाबांसोबत स्टेज वर डान्स करण्याची संधी मिळाली. ओम शांती ओम चित्रपटातील ‘तुमको पाया है तो जैसे खोया हुं…’ या गाण्यावर समीरने लेकिसोबत हा डान्स केला आहे. त्यांच्यासोबत आणखी काही मुलींना त्यांच्या वडिलांसोबत डान्स करण्याची संधी मिळाली होती. हा गोड व्हिडीओ समीरची पत्नी अनुजाने सोशल मीडियावर शेअर केला आहे. बाप लेकीच्या या गोड व्हिडिओवर लाईक्स पाऊस पडत आहे. अक्षया नाईक, पल्लवी पाटील, ऋषिकेश शेलार, गौरी किरण, शिवानी सोनार, रसिका सुनील या सेलिब्रिटींनी तर छान प्रतिक्रिया देत बाप लेकीच्या बॉंडिंगचे कौतुक केले आहे.
समीर आणि अनुजा हे दोघेही कॉलेजपासूनचे मित्र. २०१६ मध्ये या दोघांनी प्रेमविवाह केला होता. २०२१ मध्ये साचीचा जन्म झाला. साची सोबत समीर माजमस्ती करतानाचे अनेक व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असतो. समीर उत्तम गातोही त्यामुळे साची देखील समीरचे हे गुण घेऊनच हळूहळू मोठी होत आहे. शाळेच्या निमित्ताने लेकिसोबत त्याला पहिल्यांदा स्टेज शेअर करण्याची संधी मिळाली. ‘पप्पू कॅन डान्स साला’ असे म्हणत शेवटी समीरला डान्स करायला लावणारी कोणीतरी आली असे अनुजाने या व्हिडिओला कॅप्शन दिले आहे. त्यामुळे हा क्षण मोबाईलमध्ये टिपण्यासाठी अनुजा खूपच उत्सुक होती. व्हिडिओतील बाप लेकीचे हे बॉंडिंग पाहून अनेकांनी त्यांच्या व्हिडीओवर लाईक्सचा पाऊस पाडला आहे. आणि बाप लेकीच्या डान्सचे कौतुकही केले आहे.