news

रोल्स रॉयल्स खरेदी करणारी पहिली भारतीय अभिनेत्री…आयुष्यभर राणीसारखं जगली पण अखेरच्या दिवसात कामवाली सोबत

चंदेरी दुनियेत काम करत असताना उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याची पद्धत आहे. जो कलाकार प्रसिद्धीच्या शिखरावर असेल त्याला एक ना एक दिवस खाली उतरावे लागते. हा अनुभव स्वतः सुपरस्टार असणाऱ्या राजेश खन्ना यांनीही घेतला आहे. तर असाच काहीसा अनुभव ५० च्या दशकाची नायिका नादिरानेही अनुभवला आहे. जन्म इराकचा असला तरी नादिराचे कुटुंब पोटापाण्यासाठी मुंबईत दाखल झाले होते. सहज म्हणून चित्रपटात काम कारायचे म्हणून नादिराने वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी ‘मौज’ (१९४३) या हिंदी चित्रपटात बालकलाकाराची भूमिका साकारली होती. घरची आर्थिक परिस्थिती बिकट असताना नादिराने अभिनेत्री बनण्याचा निर्णय घेतला. अर्थातच तिच्या या निर्णयाला घरातून विरोध झाला. चंदेरी दुनिया म्हणजे शरीर विकण्यासारखं आपला धर्म याला मान्यता देत नाही असे म्हणत आईने तिला या क्षेत्रात जाण्यास नकार दिला होता.

film actress nadira
film actress nadira

पण पोटाचा प्रश्न समोर असल्याने नादिराने हट्टाने या क्षेत्रात जाण्यासाठी परवानगी मिळवली. मेहबुब खान यांच्या ‘आन’ चित्रपटात दिलीप कुमार यांच्यासोबत तीला प्रमुख भूमिका साकाण्याची संधी मिळाली. या चित्रपटात तिने राजकुमारीची भूमिका साकारली होती. या चित्रपटात तिने एक बोल्ड सीन देखील दिला होता ज्यामुळे ती खूप चर्चेत आली होती. या चित्रपटासाठी नादिराला ३६०० रुपये एवढे मानधन देण्यात आले होते. त्यावेळी ही रक्कम खूप मोठी असल्याने ती कुठे लपवून ठेवू असा तिच्या आईला प्रश्न पडला होता. या चित्रपटानंतर नादिरा राजेशाही थाटात आयुष्य जगायला लागली होती. हेच कारण होते की त्यावेळी नादिराने रोल्स रॉयल्स ही त्यावेळची सर्वात महागडी कार खरेदी केली होती. रोल्स रॉयल्स वापरणारी नादिरा ही पहिली भारतीय अभिनेत्री ठरली होती. आन या चित्रपटानंतर नादिराचे आयुष्य फळफळले होते. अनेक चित्रपटासाठी तिला विचारणा होऊ लागली होती. मात्र ‘श्री ४२०’ हा चित्रपटात नादिराने पहिल्यांदा खलनायिका साकारली आणि तिच्या नायिकेच्या कारकिर्दीला अधोगती लागली. या चित्रपटानंतर नादिराला नकारात्मक भूमिकाच मिळू लागल्या. शेवटी निराश होऊन तिने त्या भूमिका स्वीकारल्या.

richest bollywood actress nadira
richest bollywood actress nadira

याचदरम्यान नादिराने पहिले लग्न केले. मात्र आठवड्याभरात तिचा नवरा घरी मुली आणू लागला. नादिरा घरी असतानाही तो मुलींना आणत होता. हे पाहून नादिराने नवऱ्याचे घर कायमचे सोडून दिले. पुढे तिने दुसरा विवाह केला. मात्र काहीच दिवसात तिचा हा दुसरा संसार मोडकळीस आला. नादिराचा दुसरा नवरा खूप आळशी होता. आपणच जर याचा खर्च उचलायचा असेल तर लग्न कशासाठी केलं म्हणून नादिराने दुसऱ्या नवऱ्यालाही सोडून दिले. २००० सालच्या जोश चित्रपटात लेडी डिकोस्टाची भूमिका सकरल्यानंतर नादिरा अभिनय क्षेत्रापासून बाजूला झाली. मुंबईत ती एकटीच राहू लागली, कारण तिचे भाऊ आणि नातेवाईक इस्रायलला गेले होते. तिच्या मृत्यूपूर्वी तीन वर्ष ती तिच्या घरकाम करणाऱ्या मेडसोबत राहात होती. २४ जानेवारी २००६ रोजी नादिराला हृदयविकाराचा झटका आला त्याच अवस्थेत तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. अर्धांगवायू आणि यकृताच्या त्रासामुळे तिच्यावर उपचार सुरू होते. ९ फेब्रुवारी २००६ रोजी वयाच्या ७३ व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने तिचे निधन झाले. एका मुलाखतीत नादिराने म्हटले होते की, “लोगों को मेरी मौत की खबर मेरे मरने के ४ दिन बाद लगेगी, जब मेरे घर से सड़न की बदबू आएगी”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button