serials

आई कुठे काय करते मालिकेतील अभिनेत्रीचा गुपचूप साखरपुडा…सेलिब्रिटींकडून होतोय अभिनंदनाचा वर्षाव

मराठी सृष्टीतील आपल्या आवडत्या कलाकाराबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकालाच असते त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून ही कलाकार मंडळी आपल्या खाजगी आयुष्यातील घडामोडी चाहत्यांसोबत शेअर करत असतात. गेल्या काही दिवसांपासून मराठी सेलिब्रिटींनी घर खरेदी केल्याच्या आनंदाच्या बातम्या चाहत्यांसोबत शेअर केल्या होत्या. त्यानंतर आता प्रसिद्ध अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडा केल्याची बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे. ही अभिनेत्री आहे आई कुठे काय करते मालिकेतील गौरी म्हणजेच अभिनेत्री गौरी कुलकर्णी होय. गौरी कुलकर्णी हिने नुकताच सोशल मीडियावर एक खास फोटो शेअर केला आहे तो पाहून चाहत्यांचे तिने लक्ष वेधून घेतले आहे. गौरी कुलकर्णीने तिच्या बोटातली अंगठी दाखवत साखरपुडा केला असल्याचे जाहीर केले आहे.

aai kuthe kay karte actress gauri kulkarni
aai kuthe kay karte actress gauri kulkarni

अश्विनी कासार, मुग्धा गोडबोले, राधा सागर या सेलिब्रिटींनी तिचा साखरपुडा झाल्याची बातमी कळताच गौरीचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली आहे. गौरीचा हा फोटो पाहून अनेकांना प्रश्न पडला आहे की तिने कोणासोबत लग्नगाठ बांधण्याचा निर्णय घेतला आहे. कारण गौरीने होणाऱ्या नवऱ्याचे नाव अजूनही गुपित ठेवले आहे, पण तिच्या जवळच्या लोकांना तिच्या या साखरपुड्याबद्दल कल्पना होती. त्यामुळे तिनेही आता सोशल मीडियावर हे नाव लवकरच जाहीर करावे असे म्हटले आहे. दरम्यान गौरी कुलकर्णी ही आई कुठे काय करते मालिकेमुळेच प्रकाशझोतात आली होती. या मालिकेत गौरी गौरी कारखानीस हे पात्र साकारताना दिसली होती. मात्र या मालिकेनंतर गौरी सन मराठीवरील प्रेमास रंग यावे या मालिकेत महत्वपूर्ण भूमिकेत दिसू लागली. मालिकेतील ट्विस्टमुळे गौरीला मालिकेतून बाहेर पडावे लागले होते पण तिच्या अचानक एक्झिटमुळे यशचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले होते. गौरीच्या विरहात यश त्याचे आयुष्य संपवायला निघाला होता हे पाहून प्रेक्षकांनीही या ट्विस्टवर नाराजी दर्शवलेली होती.

gauri kulkarni engagement ring
gauri kulkarni engagement ring

गौरीने ही भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात जागा बनवली होती त्यामुळे तिचे पात्र आता मालिकेत दिसणार नसल्याचे पाहून प्रेक्षक काहीसे नाराज झाले होते. शब्दांच्या पलीकडले या मैफिलीत गौरीने कवितांचे सादरीकरण केले होते. त्याला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. गौरी कुलकर्णी ही तिच्या फोटोशूटमुळेही कायम चर्चेत असते. साडीतल्या तिच्या खास फोटोंवर चाहत्यांच्या भरभरून कमेंट्स असतात. त्यामुळे गौरीची लोकप्रियता चांगलीच वाढलेली पाहायला मिळाली होती. मात्र अशातच गौरीने साखरपुड्याची बातमी जाहीर करताच अनेक तरुणांची मनं तिने दुखावली आहेत. पण तिचा हा होणारा नवरा नक्की आहे तरी कोण याचीही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button