serials

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ अधिपती आणि अक्षराच्या लग्नाचे फोटो व्हायरल… बहिणीनेच अक्षराला फसवल्याचं होणार उघड

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत येत्या १ तारखेच्या महा एपिसोडमध्ये अक्षरा आणि अधिपती यांचं लग्न होणार आहे. रविवारी २ तासांच्या महा एपिसोडमध्ये अक्षरा आणि अधिपतीच्या लग्न सोहळ्यात वेगवेगळ्या घडामोडी घडताना पाहायला मिळणार असल्याने या दोघांचे लग्न होणार की नाही? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. गेल्या काही दिवसांपासून अक्षरा आणि अधिपतीच्या लग्नाची जोरदार तयारी मालिकेतून तुम्हाला पाहायला मिळत आहे. असं लग्न कुठेच झालं नसेल असा या लग्नाचा थाट भुवनेश्वरीला करायचा आहे. अक्षराच्या आई बाबांकडून कुठलीही खर्चाची अपेक्षा न ठेवता भुवनेश्वरी हे लग्न मोठ्या धूम धडाक्यात लावणार आहे. नुकतेच अक्षराच्या घरच्यांना भुवनेश्वरीने जेवायला आमंत्रित केले होते. अक्षराला शिकलेल्या मुलाशीच लग्न करायचे होते त्यामुळे अधिपती हे लग्न सतत मोडायचा प्रयत्न करत आहे.

irra and akshara
irra and akshara

पण अक्षरा केवळ इरासाठी या लग्नाला तयार झाली आहे. मात्र आता ह्या लग्नातच आपल्या बहिणीने फसवलं असल्याचं अक्षराला समजणार आहे. मालिकेचा नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यात अक्षरा आणि अधिपतीच्या लग्नाचा लूकदेखील समोर आला आहे. नारंगी आणि निळ्या रंगाच्या थिमला या लग्नात प्राधान्य दिले आहे. अक्षराची साडी आणि अधिपतीचा शेरवानी याच रंगाने सजलेला आहे. याच लग्नात अक्षराला इराचं सत्य समजणार आहे. मी प्रेग्नंट आहे असं इराने अक्षराला सांगितले होते. लग्नाच्या मंडपातच ती हे निखीलशी बोलताना दिसणार आहे. ” माझी बहिणी किती मूर्ख आहे” असे निखिलला सांगताना अक्षरा इराचं बोलणं ऐकते. आपलीच बहीण आपल्याशी खोटं बोलली तीने आपल्याला फसवलं? अक्षरासाठी हा खूप मोठा धक्का आहे. आता हे सत्य समजल्यावर अक्षरा अधिपतीसोबत लग्न करणार का? हे तुम्हाला मालिकेच्या पुढील काही भागातच समजणार आहे.

akshara and adhipati wedding photos
akshara and adhipati wedding photos

मालिकेत अक्षरा केवळ आपल्या बहिणीचे लग्न व्हावे म्हणून अधिपतीसोबत लग्नाला तयार झालेली आहे. त्यात भुवनेश्वरीने दिलेले मोठे आव्हान तिच्यासमोर आहे. भुवनेश्वरी अक्षरा आणि अधिपतीचे हे लग्न धुमधडाक्यात लावणार आहे मात्र हे लग्न कसे मोडता येईल याची मांडणी तिने करून ठेवली आहे. त्यात आता बहिणीनेच आपल्याला फसवल्याचा धक्कादायक खुलासा अक्षराला होणार आहे. ह्या २ तासांच्या महा एपिसोडमध्ये मोठे गदारोळ पाहायला मिळणार आहेत. आपल्या विरुद्ध रचलेले हे षडयंत्र माहित असून देखील नाईलाजाने मास्तरीण बाईंना हे लग्न करावं लागलं पण पुढे तिच्यावर कोणतं संकट ओढवणार हे येत्या काही भागात पाहायला मिळेलच.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button