news

गौतमी देशपांडे या अभिनेत्याच्या प्रेमात? फोटो व्हायरल होत असल्याने चर्चेला उधाण

गौतमी देशपांडे आणि मृण्मयी देशपांडे या दोघी बहिणी त्यांच्या अतरंगी भांडणामुळे नेहमीच चर्चेत असतात . एकमेकांच्या खोड्या काढणे, त्रास देणे, एकमेकांच्या न विचारता वस्तू वापरणे यावरून दोघींमध्ये छोटे मोठे वाद होत असतात. त्यांच्या अशा भांडणाचे व्हिडीओ चाहत्यांमध्ये तेवढेच लोकप्रिय देखील आहेत. मात्र देशपांडे कुटुंब आता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलं आहे. दोन दिवसांपूर्वी गौतमीचे आजोबा नाट्यअभिनेते अरविंद काणे यांचे दुःखद निधन झाले. त्याअगोदर साधारण दोन दिवसांपूर्वीच त्यांच्या कुटुंबात एक लग्नसोहळा पार पडला. या लग्नाचे काही खास फोटो मृण्मयीने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केलेले पाहायला मिळाले होते. या फोटोंनी चाहत्यांचेच नव्हे तर सेलिब्रिटींचेही लक्ष वेधून घेतले आहे.

gautami and mrunmayee deshpande
gautami and mrunmayee deshpande

मृण्मयी आणि गौतमी दोघीही आपल्या फॅमिली फंक्शनध्ये सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी मृण्मयीने नवरा स्वप्नील राव, बहीण गौतमी सोबत काही खास फोटो क्लिक केले होते. त्यावेळी आणखी एका अभिनेत्याचा त्यांच्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. गौतमी सोबत हा अभिनेता कोण आहे? आणि ते दोघे एकमेकांना डेट करत आहेत का? अशा प्रतिक्रिया त्या फोटोवर त्यांना मिळू लागल्या. अर्थात गौतमीसोबत दिसणारा हा अभिनेता तुम्ही ओळखला असेलच, हा अभिनेता आहे स्वानंद तेंडुलकर. स्वानंद हा बीई रोजगार, नाईन टू फाइव्ह अशा सिरीजमध्ये पाहायला मिळाला होता. स्वानंद हा भारतीय डिजिटल पार्टी अर्थात भाडीपाचा व्हॉइस प्रेसिडेंट म्हणूनही ओळखला जातो. मृण्मयीने शेअर केलेल्या फोटोमुळे स्वानंद तेंडुलकर चर्चेत आला आहे. गौतमी आणि स्वानंद दोघेही एकमेकांच्या प्रेमात आहेत का? असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांनी विचारला आहे.

gautami and swananad
gautami and swananad

तर अनेकांनी स्वानंदचा देशपांडे कुटुंबात समावेश झाला असेही या फोटोंवरून म्हटले आहे. तर सई ताम्हणकरने देशपांडे कुटुंबासोबत स्वानंदला पाहून आश्चर्य व्यक्त केलं आहे. सई आणि स्वानंद दोघेही बीई रोजगार मुळे एकत्र काम करताना दिसले होते. गौतमी आणि स्वानंद या दोघांनी आता त्यांचं हे रिलेशन ऑफिशिअली जाहीर करून टाकावं असं या फोटोंवरून म्हटलं जात आहे. आता गौतमी खरोखरच स्वानंदच्या प्रेमात आहे का ? हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल. पण ह्या फोटोजमुळे गौतमी आणि स्वानंद दोघेही चांगलेच चर्चेत आलेले पाहायला मिळत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button