news

काय झालं गौतमीच्या चित्रपटाचं? सत्य परिस्थिती आली समोर… गौतमीला फुकटात पाहायला लाखोंची गर्दी पण

२०२३ हे वर्ष गौतमी पाटील साठी खूप खास ठरलं. अवघ्या तरुणाईला वेड लावणाऱ्या या गौतमी पाटीलने अल्पावधीतच तिच्या नावाची महाराष्ट्रभर चांगलीच हवा केली. खरं तर एका अश्लील नृत्यामुळे गौतमीला काही कलाकारांनी धारेवर धरत तिला जनतेची माफी मागायला लावली होती, मात्र त्यानंतर त्याचा उलट परिणाम दिसून आला. या माफी नाम्यानंतर तर गौतमी अधिकच प्रसिद्धीच्याच झोतात येऊ लागली. राजकारण्यांच्या कार्यक्रमात, बैलाच्या वाढदिवसाला, मुलाच्या वाढदिसाला गौतमीला आमंत्रित करण्यात येऊ लागले. तिच्या घायाळ करणाऱ्या अदा पाहण्यासाठी तर तरुणाईची झुंबडच उडू लागली. गौतमीच्या या लोकप्रियतेमुळे अनेक कलाकारांच्या पोटावर मात्र पाय पडला त्यामुळे विविध स्तरातून तिच्यावर टीका करण्यात येऊ लागली. या सर्वाला गौतमीने नेहमी संयमीतपणे उत्तरं देऊन आपले काम चालू ठेवले.

ghungru marathi film poster
ghungru marathi film poster

अशातच गौतमीची ही प्रसिद्धी पाहून तिला चित्रपट सृष्टीचा मार्ग मोकळा करण्यात आला. बाबा गायकवाड यांनी गौतमीला घेऊन घुंगरू चित्रपट बनवण्याची घोषणा केली. चित्रपटाचे दिग्दर्शन, कथा लेखन, अभिनय आणि निर्मितीची धुराही त्यांनी सांभाळली. “घुंगरू” या चित्रपटातून गौतमी रुपेरी पडद्यावर झळकणार अशी चर्चा देखील सुरू झाली. अर्थात गौतमी देखील आपल्या पहिल्या वहिल्या चित्रपटासाठी तेवढिच उत्सुक होती. कुठल्याही मुलाखतीवेळी ती आपला चित्रपट प्रदर्शित होत असल्याचे चाहत्यांना वारंवार सांगू लागली. माझा चित्रपट येतोय आणि हा चित्रपट पाहण्यासाठी तुम्ही चित्रपटगृहामध्ये नक्की गर्दी करा असे तिने तिच्या चाहत्यांना आवाहन सुद्धा केले. १५ डिसेंबर २०२३ रोजी गौतमी पाटीलचा चित्रपट प्रदर्शित झाला. महाराष्ट्रातील १०० स्क्रीनवर हा चित्रपट दाखवण्यात आला. गौतमीसह बाबा गायकवाड, सुदाम केंद्रे, उषा चव्हाण, वैभव गोरे, शीतल गीते हे कलाकार या चित्रपटात झळकले.

gautami patil movie ghungru ek sangharsh
gautami patil movie ghungru ek sangharsh

मात्र प्रेक्षकांनी गौतमीच्या चित्रपटाकडे पाठ फिरवलेली पाहायला मिळाली. १५ डिसेंबरला प्रदर्शित झालेला घुंगरू चित्रपट पाहण्यासाठी मोजक्याच प्रेक्षकांनी हजेरी लावली. गौतमीला फुकट पाहण्यासाठी लोकं तौबा गर्दी करतात पण तिकीट लावून कोणी पाहणार नाही हे तिच्या बाबतीत वर्तवलेले भाकीत मात्र यावेळी खरे ठरलेले पाहायला मिळाले. त्यामुळे अवघ्या सात दिवसात घुंगरू चित्रपटाला आपला गाशा गुंडाळावा लागला. अनेक ठिकाणी ह्या चित्रपटाचे बॅनर पाहायला मिळाले पण काही दिवसातच चित्रपटाचे बॅनर देखील उतरवण्यात आले. फनस्क्वेअर सिनेमा हॉल मध्ये ह्याची विचारपूस केली असता चित्रपट दुपारच्या १२ च्या शोलाही गर्दी पाहायला मिळाली नाही. गौतमीच्या नावाने लोक गर्दी करतील हि अपेक्षा होती पण वास्तवात चित्रपट पाहायला येणाऱ्यांची संख्या बोटावर मोजण्या इतकीच होती त्यामुळे अवघ्या ७ दिवसातच चित्रपट काढण्यात आल्याचं सांगण्यात आलं. गौतमी मोठ्या पडद्यावर आली आली म्हणता ती कधी गायब झाली हेही लोकांना कळले नाही. भविष्यात तिच्या वाट्याला नक्कीच चांगल्या चांगल्या भूमिका येवोत आणि चंदेरी दुनियेत जम बसवण्याचे तिचे स्वप्न पूर्ण होवो हीच सदिच्छा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button