serials

झी मराठी वाहिनीची आणखीन एक मालिका लवकरच होणार बंद… तर हि मालिका येणार टीआरपीच्या टॉप १० च्या यादीत

मी मराठी झी मराठी असं म्हणत सुरवात केलेल्या झी मराठीने एका मागून एक सुपरहिट मालिका दिल्या पण गेल्या २ ते ३ वर्षांपासून झी मराठीचा दर्जा घसरलेला पाहायला मिळतो. सध्या झी मराठीची कोणतीही मालिका टॉप १० च्या यादीत पाहायला मिळत नाही. ह्याच कारणामुळे सध्या काही नव्या धाटणीच्या मालिका झी वाहिनीने आणलेल्या आहेत. पारू,शिवा, नवरी मिळे हिटलरला आणि तुला शिकवीन चांगलाच धडा या ४ मालिका सध्या चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत.

navri mile hitlarla serial actress
navri mile hitlarla serial actress

ह्यातील नवरी मिळे हिटलरला हि मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे मालिकेचा टीआरपी दिवसेंदिवस चांगला वाढलेला पाहायला मिळत आहे त्यामुळेच हि मालिका येत्या काही दिवसातच टॉप १० च्या यादीत पाहायला मिळेल अशी आशा आहे. तर झी वाहिनीच्या काही जुन्या मालिका आता खूपच कंटाळवाण्या झाल्या आहेत खुद्द प्रेक्षकच मालिका बंद करा अशी प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत. टीआरपीच्या यादीत खूप तळाला असलेली सातव्या मुलीची सातवी मुलगी हि मालिका आता संपण्याच्या मार्गावर आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मालिकेत नवनवीन पात्रे घुसवून मालिकेला खतपाणी घातलं गेलं पण आता हि मालिका लवकरच संपणार असल्याची चर्चा सूत्रांच्या माध्यमातून ऐकायला मिळत आहे.

satvya mulichi satvi mulgi serial
satvya mulichi satvi mulgi serial

मालिकेतील अभिनेत्री तितिक्षा तावडे हिने खऱ्या आयुष्यात काही दिवसांपूर्वीच लग्न केलं आहे. तर मालिकेतील अभिनेता अजिंक्य ननावरे ह्याने देखील लग्नगाठ बांधली आहे. झी मराठी वाहिनी एक उत्तम मालिका निर्माण करणारी वाहिनी म्हणून ओळखली जाते. मालिकेतील शीर्षक गीतापासून ते मालिकेतील प्रत्येक बारकाव्यात वाहिनी विशेष लक्ष घालत आहे. लवकरच झी वाहिनी पूर्वी प्रमाणे यश संपादन करेल अशी आशा व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button