news

नांदा सौख्यभरे….जुळून येती रेशीमगाठी मालिकेतील अभिनेत्याच्या लग्नाला कलाकारांची जमली मांदियाळी

कलासृष्टीत लग्नसोहळ्याचे वारे वाहू लागले आहेत. गेल्या काही दिवसात मराठी सृष्टीतील अनेक कलाकारांनी साखरपुडा करून आयुष्याला नवी सुरुवात केलेली पाहायला मिळाली. दरम्यान आता जुळून येती रेशीमगाठी मालिकेतील अभिनेत्याने मोठ्या थाटात लग्नगाठ बांधलेली पाहायला मिळाली. या अभिनेत्याच्या लग्नाला मराठी सृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. हा अभिनेता म्हणजेच कौस्तुभ दिवान होय. काल गुरुवारी १८ एप्रिल रोजी कौस्तुभने कीर्ती कदम हिच्याशी लग्नगाठ बांधली होती. त्यांच्या लग्नाला आस्ताद काळे, स्वप्नाली, पाटील, शिल्पा नवलकर, मेघा धाडे, अभिजित केळकर, राजन ताम्हाणे अशा मराठी सृष्टीतील नामवंत कलाकारांनी हजेरी लावली होती. कौस्तुभ आणि कीर्तीच्या लग्नाचे काही खास क्षण त्यांनी सोशल मीडियावर शेअर करत लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

kaustubh diwan and kirti kadam wedding photos
kaustubh diwan and kirti kadam wedding photos

कौस्तुभ दिवान बद्दल सांगायचं झालं तर जुळून येती रेशीमगाठी या झी मराठी वरील लोकप्रिय मालिकेत त्याने आदित्य नगरकर हे पात्र साकारले होते. नायिकेचा बॉयफ्रेंड अशी त्याने भूमिका साकारली होती. ही मालिका आजही रसिक प्रेक्षकांच्या चांगलीच स्मरणात राहिली आहे. कौस्तुभ दिवान हा लवकरच विवाहबद्ध होणार असे जाहीर करण्यात आले होते. गेल्याच महिन्यात त्याचे केळवण सेलिब्रिटींकडून मोठ्या थाटात साजरे करण्यात आले होते. मेघा धाडे, शिल्पा नवलकर, शाल्मली तोळे, स्वप्नाली पाटील, आस्ताद काळे, राजन ताम्हाणे या सेलिब्रिटींनी कौस्तुभचे केळवण साजरे केले होते. त्यावेळी कौतुभची होणारी पत्नी कीर्ती कदम हिलाही आमंत्रित करण्यात आले होते. कौस्तुभ आणि कीर्ती या दोघांनी जानेवारी महिन्यात मोठ्या थाटात साखरपुडा केला होता. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच या सेलिब्रिटींनी त्यांचे केळवण साजरे केले. “असेच प्रेम राहू!” असे म्हणत केळवणाच्या सोहळ्याची खास आठवण कौस्तुभने चाहत्यांसोबत शेअर केली होती. दोन दिवसांपूर्वी कौस्तुभने मेंदी सोहळ्याचे फोटो शेअर केलेले पाहायला मिळाले होते.

kaustubh diwan and kirti wedding
kaustubh diwan and kirti wedding

कौस्तुभ दिवान हा मालिका सृष्टीतील तो एक प्रसिद्ध चेहरा म्हणून ओळखला जातो. त्याने वेगवेगळ्या धाटणीच्या मालिकेत काम केलेले आहे. एक उत्तम अभिनेता असण्यासोबतच तो उत्तम लेखक देखील आहे. बऱ्याचशा मालिकांसाठी त्याने लेखन केले असून त्याच्या कामाचं वेळोवेळी कौतुकही झालं आहे. जुळून येती रेशीमगाठी या मालिकेमुळे कौस्तुभला चांगली लोकप्रियता मिळाली होती. बंध रेशमाचे, घर श्रीमंताच, कोड मंत्र, सिटीझन, जेता, प्रेम कहाणी एक लपलेली गोष्ट अशा चित्रपट, नाटक तसेच मालिकेतून तो विविधांगी भूमिकेत झळकला आहे. वेगवेगळ्या मंचावर त्याने निवेदक म्हणूनही काम केलेले आहे. पोस्ट ऑफिस उघडं आहे या सोनी मराठीवरील मालिकेत त्याने एक छोटेसे पात्र साकारले होते. स्टार प्रवाहच्या आंबट गोड या मालिकेत तो स्त्री भूमिकेत दिसला होता. अभिनय आणि लेखन क्षेत्रातील त्याचा प्रवास अविरत चालूच आहे. दरम्यान कौस्तुभ आणि कीर्तीच्या लग्नाचा थाट पाहण्यासाठी त्याचे चाहते देखील तेवढेच उत्सुक होते या नवविवाहित दाम्पत्यास आयुष्याच्या या नवीन वाटचालीसाठी शुभेच्छा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button