serials

अखेर फुलराणीचं सत्य उलगडलं… अक्षराची मैत्रीण बनून आलेली फुलराणी उडवणार धमाल

झी मराठीवरील तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेत रंजक घडामोडी घडत आहेत. सासरे चारुहास यांना आजारातून बरे करण्यासाठी अक्षराने कंबर कसलेली पाहायला मिळत आहे. यात तिला वेळोवेळी अधिपतीचीही साथ मिळत आहे. पण या भानगडीत एक ना एक दिवस अक्षरा भुवनेश्वरीच्या जाळ्यात नक्कीच अडकणार याची भीती प्रेक्षकांना वाटत आहे. त्याचमुळे ही मालिका अधिकच रंजक होत चालली आहे. अक्षरा जे काही करते ते ती तिच्या कुटुंबासाठीच करत आहे. भुवनेश्वरीचा विरोध जुमाणून ती आजवर तिच्या सासऱ्यांना डॉक्टरांकडे घेऊन जाण्यास यशस्वी ठरली आहे. पण यावेळी तिच्या मदतीला फुलराणी धावून आली आहे. मालिकेत एन्ट्री करणाऱ्या फुलराणीची एक पाठमोरी झलक दाखवण्यात आली होती. ही फुलराणी नेमकी कोण आहे? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता.

tula shikvin changlach dhada serial actress
tula shikvin changlach dhada serial actress

या प्रश्नाचे उत्तर आता मिळालेले दिसून आले आहे. अक्षराला मदत करण्यासाठी आलेली ही फुलराणी भुवनेश्वरीची सासू असावी असा अंदाज अनेकांनी बांधला होता. ही भूमिका रोहिणी हट्टंगडी किंवा विद्या करंजीकर सकरतायेत आई तर्क लावण्यात आले होते. पण मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये ही फुलराणी अक्षराच्या मदतीला धावून आलेली दाखवली आहे. या फुलराणीने तिचा चेहरा मास्कने लपवलेला आहे. पण हा चेहरा जाणकार प्रेक्षकांनी मात्र लगेचच ओळखला आहे. कारण ही फुलराणी दुसरी तिसरी कोणी नसून फुलपगारे मास्तर आहेत. फुलपगारे यांनी स्त्री वेशांतर करून चारुहास सरांना डॉक्टरांकडे घेऊन जाण्यासाठी अक्षराची मदत करत आहेत. अशात भुवनेश्वरी मॅडमने आपल्याला ओळखु नये यासाठी त्यांनी तोंडावर मास्क चढवला आहे. ज्येष्ठ अभिनेते विजय गोखले यांनी फुलपगारे मास्तरांची भूमिका साकारली आहे.

vijay gokhane as fulrani in serial
vijay gokhane as fulrani in serial

त्यामुळे फुलराणीच्या गेटअपमध्येही त्यांना प्रेक्षकांनी ओळखले आहे. आता अक्षरा आणि फुलराणी भुवनेश्वरीच्या तावडीतून कसे नसटतात याची उत्सुकता लागून राहिली आहे. कारण याअगोदर जोगतीन म्हणून आलेल्या शाळेतल्या शिक्षिकेला दुर्गेश्वरीने ओळखले होते . या प्रकरणात अधिपती मध्ये पडल्यानंतर अक्षरावरचे संकट तूर्तास टळले होते. पण आता फुलपगारे मास्तरांना भुवनेश्वरी ओळखणार का? की अक्षरा तिच्या कामात यशस्वी होणार हे पाहणे रंजक ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button