
माजी केंद्रीय शिक्षण मंत्री तसेच उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांची मुलगी आरुषी निशंक ही नुकतीच फसवणुकीची बळी ठरली आहे. आरुषी निशंक हिने नवरा अभिनव पंत यांच्यासोबत जाऊन देहरादूनच्या राजपूर पोलिस ठाण्यात निर्मात्याविरोधात एफआयआर दाखल केली आहे. पोलिसांकडे दाखल केलेल्या या तक्रारीत आरुषीने म्हटले आहे की, एका चित्रपटात तिला मुख्य अभिनेत्रीची भूमिका देण्यात येईल तसेच गुंतवणूक करून तुम्हाला मोठा नफा मिळवून देतो असे आमिष दाखवून तिची तब्बल ४ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.

या प्रकरणात आरुषी निशंक यांनी मुंबईतील २ चित्रपट निर्माते ‘मानसी वरुण बागला आणि वरुण प्रमोद कुमार बागला’ यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केली आहे. आरुषीने त्यांच्यावर केवळ फसवणुकीचा गुन्हा दाखल केला नाही तर मानसिक छळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही केला आहे. आरुषी निशंकने तिच्या तक्रारीत म्हटले आहे की ती तिच्या हिमश्री फिल्म्स द्वारे चित्रपटांची निर्मिती करते . जेव्हा निर्माते बागला यांनी तिला सांगितले की तो शनाया कपूर आणि विक्रांत मेस्सी यांना घेऊन ‘आंखों की गुस्ताखियां’ नावाचा चित्रपट बनवत आहे.

या चित्रपटात त्याची आणखी एक मुख्य नायिका असणार आहे आहे, जी त्याने ही भूमिका आरुषी निशंकला ऑफर केली होती. निर्मात्याने आरुषीला सांगितले होते की हा चित्रपट खूप नफा कमवेल पण त्याआधी तिला त्यात ५ कोटी रुपये गुंतवावे लागतील. आरुषी निशंकने निर्मात्याला ४ कोटी रुपये दिले होते. पण त्यानंतर दोघांनीही तीला चित्रपटात भूमिका दिली नाही किंवा चित्रपटाचे कथानक ऐकवले नाही.