‘महाकुंभबद्दल अनेक मतमतांतर आहेत त्याबद्दल तुमचं काय मत आहे?’ प्राजक्ताच्या प्रश्नावर स्वामी गोविंद देवगिरी महाराजांचे लक्षवेधी उत्तर

नुकतेच अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने महाकुंभमध्ये हजेरी लावली होती. तिथे गेल्यानंतर भक्तिमय वातावरणात तिने कुंभ स्नान केले. १४४ वर्षाने होणाऱ्या या महाकुंभमध्ये हजेरी लावावी अशी तिची इच्छा होती. याची डोळा हा अनुभव घ्यावा असा तिने विचार केला. प्राजक्ता माळीच अध्यात्म प्रेम अनेकांना परिचयाच आहे. काहीच दिवसांपूर्वी तिने १२ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले होते. पण आता कुंभ मेळ्यात तिने स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांची भेट घेतली. त्यांच्यापुढे नतमस्तक होऊन मनातला एक प्रश्न त्यांना विचारला. ‘महाकुंभबद्दल अनेक मतमतांतर आहेत त्याबद्दल तुमचं काय मत आहे?’…
प्राजक्ताने विचारलेल्या या प्रश्नावर स्वामी गोविंद देवगिरी महाराज उत्तर देताना म्हणतात की, “सर्वात महत्वाची गोष्ट ही की, आपल्या शास्त्रात मुहूर्ताचं महत्व असतं, विशिष्ट स्थळांना महत्व असतं. एक गोष्ट विशिष्ट स्थळी केली तर त्याचं महत्व कित्येक पटीनं वाढतं. जसं की शास्त्राप्रमाणे एक माळचा जप तुम्ही तुमच्या घरात केला तर एकपट फळ आहे, पण तोच एक माळ जप जर तुम्ही गायीच्या गोठ्यात बसून केला तर त्याचं १० माळांच फळ मिळतं. तोच जप जर गंगेच्या तीरावर केला तर १००० माळांचं फळ मिळतं.आणि तोच जर आपल्या गुरूंच्या जवळ बसून केला तर अनंत फळ मिळतात. माळ एकच आहे वेळही तितकाच लागणार आहे, स्थळ बद्दलल्याबरोबर त्याचं फळ बदललं. असं जे जागेबद्दल आहे तसच मुहूर्तांचपण आहे. या कुंभांच्या वेळेला जे मुहूर्त येतात त्या मुहूर्तांच्या मध्ये विशिष्ट प्रकारचा एक प्रभाव त्या जलामध्ये निर्माण झालेला असतो.

पौराणिक कथेप्रमाणे अमृताचे बिंदू ज्या ज्या ठिकाणी पडले त्या त्या ठिकाणी अमृतांच्या बिंदूंचा प्रभाव पाहायला मिळतो. आम्ही शास्त्रीय गोष्ट एखाद्या कथेमध्ये बसवून सांगतो त्यामुळे लोकांना ती श्रद्धा म्हणून जास्त पटते. उदाहरण म्हणून सांगतो, कोजागिरीच्या रात्री चंद्राखाली दूध ठेवून नंतर ते दूध देवाचा नैवेद्य म्हणून प्राशन करणं याचं वेगळं महत्व आहे. हे जसं कोजागिरीच्या रात्रीच महत्व आहे ते आपल्याला कळतं त्याप्रमाणे या कुंभाचंही महत्व आहे. गंगा, यमुना, सरस्वती या तिन्ही माता एकत्र होतात, प्रयाग हा तिर्थराग मानला आहे , म्हणून या मुहुर्तावर इथे केलेल्या स्नानाला अतिशय महत्व आहे.”