serials

सुंदरा मनामध्ये भरली मालिकेतील अभिनेत्याच्या मुलीचं थाटात पार पडला लग्न सोहळा फोटो होत आहेत व्हायरल

सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेने काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. मात्र या मालिकेतील सर्वच पात्रांनी आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक छाप पाडली आहे. या मालिकेतील आप्पा म्हणजेच उत्तमराव जहागीरदार हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्याच्या मुलीचे काही दिवसांपूर्वीच थाटात लग्न पार पडले. ज्येष्ठ अभिनेते प्रकाश धोत्रे यांच्या मुलीचा अहमदनगर येथे नुकताच विवाहसोहळा संपन्न झाला. श्रद्धा धोत्रे ही प्रकाश धोत्रे यांची कन्या. श्रध्दा ही डेंटिस्ट आहे डॉ प्रतीक कस्तुरे याच्याशी तिचे मोठ्या थाटात लग्न झाले असून या नवविवाहित दाम्पत्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. अभिनेते प्रकाश धोत्रे हे देखील उच्च शिक्षित आहेत.

shradha and pratik wedding photos
shradha and pratik wedding photos

आपल्या मुलीनेही शिकून स्वतःच्या पायावर उभे राहावे अशी त्यांची इच्छा होती. श्रद्धाने देखील मेहनतीच्या जोरावर डॉक्टर बनून वडिलांचे नाव लौकिक केले. प्रकाश धोत्रे यांचे अहमदनगर येथील चितळी या गावी बालपण आणि शिक्षण झाले होते. सध्या ते आपल्या कुटुंबासोबत प्रवरानगर येथे वास्तव्यास आहेत. इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगची त्यांनी पदवी प्राप्त केली असून मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स क्षेत्रात ते फॉर्मर ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत. सरकारी नोकरी सांभाळत प्रकाश धोत्रे यांनी आपली अभिनयाची आवड देखील जोपासली आहे. गेली अनेक वर्षे नाटक, चित्रपट तसेच मालिका क्षेत्रात त्यांनी अनेक दमदार भूमिका साकारल्या आहेत. १४० हुन अधिक चित्रपट, ५० हुन अधिक टीव्ही मालिका तसेच हिंदी क्षेत्रातही त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेतून ते आप्पाच्या भूमिकेत झळकले होते.

pradha dhotre and pratik kasture wedding photos
pradha dhotre and pratik kasture wedding photos

घाशीराम कोतवाल, बापू बिरु वाटेगावकर, इपितर, सासरची साडी, ढाण्या वाघ, काळूबाई पावली नवसाला, ट्रिपल सिट, बत्ती गुल पावरफुल अशा अनेक चित्रपटातून त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या. विशेष म्हणजे खलनायकी ढंगाच्या भूमिकेसाठी त्यांना जास्त ओळखले जाते. झुबकेदार मिशा आणि नजरेतला करारीपणा यामुळे त्यांना बऱ्याचदा विरोधी भूमिका मिळाल्या आहेत. घाशीराम कोतवाल मधील त्यांनी साकारलेला घाशीराम खूप गाजला होता. रंगभूमी गाजवलेल्या प्रकाश धोत्रे यांनी पुढे चित्रपटात देखील दमदार अभिनयाने स्वतःची वेगळी ओळख बनवली. अहमदनगरच्या सांस्कृतिक नगरीतील एक मानाचं पान अशीही त्यांनी ओळख बनवली आहे. उत्कृष्ट अभिनयामुळे आजवर अनेक पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे. तूर्तास डॉ श्रद्धा धोत्रे आणि डॉ प्रतीक कस्तुरे या नवविवाहित दाम्पत्याला आयुष्याच्या या नवीन प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button