news

तू आज आमच्यात नाहीयेस पण….तू माझा हात हातात घेऊन प्रॉमिस घेतलं होतस की हार्दिक काही झाल तरी

झी मराठी वाहिनी ‘जाऊ बाई गावात’ हा नवीन रिऍलिटी शो प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. या रिऍलिटी शोमध्ये ऐशोआरामात राहिलेल्या शहरातल्या तरुणींना गावाकडे राहुन दाखवायचं आहे. हे चॅलेंज जी स्पर्धक योग्यपद्धतीने पेलेल ती या शोची विजेती ठरणार आहे. येत्या ४ डिसेंबर रोजी रात्री ९.३० वाजता हा खेळ प्रसारित होत आहे. या शोचे गावरान बाज असलेले भन्नाट शीर्षक गीत नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. त्याला लोकांकडून चांगली पसंती देखील मिळत आहे. दरम्यान या शोमध्ये हार्दिक जोशी सूत्रसंचालन करताना दिसणार आहे तसेच शोमध्ये असलेल्या स्पर्धकांना तो वेगवेगळे चॅलेंजेस समजावून सांगणार आहे. त्यामुळे या शोची उत्सुकता आतापासूनच शिगेला पोहोचली आहे.

hardik joshi with family
hardik joshi with family

पण हार्दिक जोशीने हा शो स्वीकारावा म्हणून त्याच्या वहिनीची मनापासून इच्छा होती. आज वहिनी आपल्यात नाही पण तिची इच्छा म्हणून आपण हा शो करतोय अशी एक भावनिक पोस्ट गटाने सोशल मीडियावर शेअर केली आहे. ज्योती हे हार्दीकच्या वहिनीची नाव आहे तो तिच्या खूप क्लोज होता अगदी मोठ्या बहिणीसारखी माया ज्योती वहिनीने त्याच्यावर लावली होती. तिच्या आठवणीत हार्दिक होशी भावूक होऊन म्हणतो की, “ज्योती वहिनी तू आज आमच्यात नाहीयेस पण तूझ अस्तित्व आमच्यात कायम राहील..जाऊ बाई गावात हा जो नवीन शो मी करत आहे झी मराठीवर तो फक्त तुझ्यामुळे तो पुर्ण शो मी फक्त तुलाच डेडिकेट करतोय कारण तू माझा हात हातात घेऊन प्रॉमिस घेतलं होतस की हार्दिक काही झाल तरी हा शो तू करणारच आहेस आणि योगायोग असा आहे की 4 डिसेंम्बर च्या दिवशी हा शो टीव्हीवर दिसायला सुरुवात होणार आहे .

hardik joshi vahini jyoti
hardik joshi vahini jyoti

आणि त्याच दिवशी तुझा वाढदिवस आहे. मि नेहमी कामाला जाताना तुला नमस्कार करायचो तेव्हा कायम डोक्यावर हात फिरऊन तू मला आशीर्वाद द्यायची ..तुझा आशीर्वाद असाच कायम माझ्या पाठीशी असुदे…आज मि जे काही आहे त्यात तुझा खुप मोठा वाटा आहे. तु सदैव आई, बहिण, मैत्रीण म्हणुन माझ्या सोबत पाठीशी होतीस तशीच कायम रहा ही विनंती करतो. तुझी उणीव कायम भासत राहिल Miss you @jyoti.naisha i माझी लाडकी वहिनी मला कधी विसरु नको Always love you always khup khup miss you”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button