serials

अखेर ३ वर्षानंतर स्टार प्रवाहची मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप…नव्या मालिकेत दिसणार हि सुंदर अभिनेत्री

स्टार प्रवाह वाहिनी गेले तीन वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. कारण या तीन वर्षात स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकेने टीआरपीच्या स्पर्धेत टॉप दहाच्या यादीत ताबा मिळवला आहे. झी मराठीचा टीआरपी डावलून या वाहिनीने आपले स्थान टिकवून ठेवण्यात यश मिळवले आहे. त्यात आता जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत आणि नवीन मालिका दाखल केल्या जात आहेत. टीआरपीच्या स्पर्धेत टॉप दहाच्या यादीत टिकून राहिलेली सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. गेल्या काही दिवसांपासून या मालिकेत अनेक ट्विस्ट घुसडण्यात आले. त्याला प्रेक्षकांनी नाराजी दर्शवली. जयदीप आणि गौरीवरचे सततचे संकट पाहून या मालिकेला टीकेचा धणी व्हावे लागले.

sukha mhanje nakki kay ast serial
sukha mhanje nakki kay ast serial

त्यामुळे आता या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेण्याचे निश्चित केले आहे. १७ ऑगस्ट २०२० रोजी सुरू झालेली ही मालिका पुढच्या महिन्यात प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेच्या जागी आता तुम्हाला “लक्ष्मीच्या पाऊलांनी” ही नवीन मालिका पाहायला मिळणार आहे. २० नोव्हेंबर पासून रात्री ९.३० वाजता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे त्यामुळे सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेपासून अखेर सुटका मिळणार असल्याने प्रेक्षकांनी निश्वास टाकला आहे. लक्ष्मीच्या पाऊलांनी ही नवीन मालिका ‘तेरी मेरी डोरीयां’ या हिंदी मालिकेचा रिमेक असल्याचे बोलले जाते. मालिकेच्या प्रोमोवरूनच तसा अंदाज बांधला जात आहे. तीन बहिणींची ही कहाणी आणि यिन धनाढ्य तरुणांशी कशी लग्नगाठ बांधतात याची ही कहाणी असणार आहे. अभिनेत्री ईशा केसकर आणि अक्षर कोठारी या मालिकेतून मुख्य भूमिका साकारत आहेत.

laxmichya pavlani new serial
laxmichya pavlani new serial

तर ध्रुव दातार, ऋत्विक तळवलकर, दीपाली पानसरे, किशोरी अंबिये , रोहिणी नाईक, अपूर्वा सकपाळ हे या मालिकेत महत्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. किशोरी अंबिये या तीन मुलींच्या आईच्या भूमिकेत आहेत. आपल्या तिन्ही मुलींची लग्न त्यांना श्रीमंत मुलांशी करायची आहेत. अक्षर कोठारी ,ध्रुव दातार आणि ऋत्विकतळवलकर या तीन भावंडांची भूमिका साकारत आहेत तर ईशा केसकर, अपूर्वा सकपाळ आणि रोहिणी नाईक तीन बहिणीची भूमिका साकारत आहेत. किशोरी अंबिये या मालिकेतून पुन्हा एकदा नटखट भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. मुलींच्या जबाबदारीच्या ओझ्यात वावरत असणाऱ्या आईची हलकी फुलकी कॉमेडी त्या साकारत आहेत. त्यामुळे ही मालिका पाहण्यासाठी प्रेक्षकही तेवढेच उत्सुक झाले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button