त्याला होणारा त्रास मी स्वतः पाहिला…. तो खूप आजारी होता त्याच्या डोळ्याच्या नसमुळे ओंकार
बॉईज चित्रपटाच्या यशानंतर या चित्रपटाचे अनेक भाग बनवण्याचा निर्मात्यांचा विचार आहे. विशाल देवरुखकर यांनी या सिकवलचे तब्बल ७ भागांचे स्क्रिप्ट लिहून तयार ठेवले आहेत. त्यापैकी तीन चित्रपट प्रदर्शित करण्यात आले आहेत. बॉईज ४ हा चित्रपट २० ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात पार्थ भालेराव महत्वपूर्ण भूमिकेत आहे. पार्थशिवाय हा चित्रपटच होऊ शकत नाही असे मत चित्रपट पाहणाऱ्यांचे देखील आहे. बॉईज चित्रपट तेवढ्यापुरताच थांबला होता पण निर्मात्यांनी बॉईज २ देखील आणण्याचा निर्णय घेतला. पण त्यानंतर या चित्रपटाच्या ७५ सिरीज याव्यात अशी अवधूत गुप्तेची इच्छा आहे.
दरम्यान बॉईज २ आणि बॉईज ३ मध्ये ओंकार भोजने पाहायला मिळाला होता. पण बॉईज ४ चा ट्रेलर प्रेक्षकांच्या समोर आला तेव्हा त्यात ओंकार भोजने दिसला नाही. यावरून प्रेक्षकांनी नाराजी दर्शवलेली पाहायला मिळाली. ओंकार ऐवजी गौरव मोरे, निखिल बने यांना या चित्रपटात संधी देण्यात आली. नाराज प्रेक्षकांनी याबद्दल प्रश्न उपस्थित केला तेव्हा विशाल देवरुखकर यांनीच स्वतः यामागचे कारण सांगितले. ओंकार भोजने बॉईज ४ मध्ये का नाही याचे कारण सांगताना विशाल देवरुखकर म्हणतात की, “आम्ही ओंकारला बॉईज ४ चित्रपटासाठी विचारले होते. पण त्यावेळी तो खूप आजारी होता. त्याच्या डोळ्याच्या नसमुळे ओंकार खूप त्रस्त झाला होता. त्याला होणारा त्रास मी स्वतः पाहिला होता. त्याला पूर्णपणे विश्रांतीची गरज होती.
ओंकाकडे आणखीही काही प्रोजेक्ट्स होते त्याला तेही कम्प्लिट करायचे होते. त्यामुळे सध्या तरी मी या चित्रपटात काम करू शकत नाही असे त्यानेच आम्हाला सांगितले होते. त्यामुळे ह्यावेळी आम्ही ओंकारशिवाय हा चित्रपट करण्याची तयारी दर्शवली.” दरम्यान ओंकार भोजने महाराष्ट्राची हास्यजत्रा नंतर अनेक प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्याला पुन्हा हास्यजत्रामध्ये आणावे अशी मागणी केली जात आहे. ओंकार सध्या करून गेलो गाव या नाटकाच्या दौऱ्यामध्ये व्यस्त आहे. पण बॉईज सिरीजचा तो भाग असणार आहे फक्त आरोग्याच्या कारणास्तव त्याने बॉईज ४ चित्रपट सोडला पण पुढे तो या सिरीजमध्ये नक्की येईल असे आश्वासन त्याने विशाल देवरुखकर यांना दिले आहे.