serials

सारं काही तिच्यासाठी मालिकेच्या वेळेत बदल… पण नवीन ट्विस्ट पाहून प्रेक्षकच भडकले

झी मराठी वाहिनीवर उद्यापासून लाखात एक आमचा दादा ही नवी मालिका प्रसारित होत आहे. रात्री ८.३० वाजता ही मालिका प्रसारित होत असल्याने अगोदरच्या मालिकेच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. या वाहिनीवर सुरू असलेली सारं काही तिच्यासाठी ही मालिका आता नवीन वेळेनुसार म्हणजेच संध्याकाळी ६.३० वाजता दाखवली जात आहे. अर्थात लाखात एक आमचा दादा या मालिकेचे कथानक थोडेसे तगडे असल्याने ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीच्या ठरलं तर मग या मालिकेला चांगली टक्कर देईल असा विश्वास वाहिनीला आहे. याचसाठी साडे आठच्या स्लॉटमध्ये असलेली सारं काही तिच्यासाठी या मालिकेला बाजूला काढण्यात आले आहे.

मालिकेत बदल झाला असला तरी आता ही मालिका एका नवीन ट्विस्टमुळे प्रेक्षकांच्या टीकेला सामोरी जाताना दिसत आहे. सारं काही तिच्यासाठी या मालिकेचा नवीन प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्यासमोर आला आहे. निशी आणि नीरज आता त्यांच्या मुंबईच्या नवीन घरी राहायला गेले आहेत. पण तिथे गेल्यानंतर निरजची एक खास मैत्रीण त्याला भेटायला येत आहे. अर्थात निशी आणि निरजच्या नात्यात दुरावा आणण्यासाठीच त्याच्या आईने हे नवीन कारस्थान रचलेलं आहे. पण या नवीन ट्विस्टवर प्रेक्षक चांगलेच भडकलेले आहेत. सगळं सुरळीत दाखवण्या ऐवजी काहीतरी आडकाठी घालून मालिकेचे कथानक वाढवले जाते. तर तिकडे चारुचे विचित्र वागणे पाहून लाली आत्यालाही आपली चूक झाल्याची जाणीव होणार आहे.

saar  kahi tichyasathi new actress
saar kahi tichyasathi new actress

पण या वाढीव कथानका ऐवजी मालिकेने योग्य वेळेत आटोपते घ्यायला हवे असे प्रेक्षकांचे म्हणणे आहे. तसेच सारं काही तिच्यासाठी या मालिकेचे कथानक कुठेतरी भरकटल्यासारखे वाटत आहे. लालीचं विचित्र वागणं तिला मुक्त असलेली चारुची साथ निरजच्या आईचे कटकारस्थान या पलीकडे जाऊन नायक नायिका लवकरात लवकर एकत्र येऊन कथानक सुरळीत सुरू व्हावे अशी अपेक्षा आहे. पण तरीही केवळ मालिका सुरू राहावी यासाठी जो प्रयत्न केला जात आहे तो कुठेतरी थांबायला हवा हे वेळीच लक्षात घ्यायला हवे. नाहीतर अशा मालिकेकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्यास नवल वाटायला नको.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button