आयुष्यात बायकोची साथ किती महत्वाची ह्याचे उत्तम उदाहरण … प्रशांत दामले सुरवातीला बेस्टमध्ये कामावर होते तेंव्हाची हि गोष्ट

मराठी चित्रपट, नाटक तसेच मालिकांमधून कधी अभिनेता तर कधी सूत्रसंचालन करणारा अष्टपैलू कलाकार म्हणजे प्रशांत पुरुषोत्तम दामले. १९८३ साली टुरटुर नाटकाद्वारे अभिनेते प्रशांत दामले यांनी व्यावसायिक नाटय कारकिर्दीला सुरुवात झाली. त्यात त्याना एका मद्रासी माणसाची भूमिका कारायला मिळाली . अर्थात ते कोणत्याही बाजूने मद्रासी दिसत नसलो तरीही . जो माणूस हि भूमिका करायचा तो न आल्याने हि भूमिका त्यांना करावी लागली. नाटकात लक्ष्मीकांत बेर्डे, सुधीर जोशी, विजय कदम यांसारख्या कसलेल्या कलावंतासोबत काम करण्याची संधी प्रशांतला मिळाली. यातही गमतीचा भाग म्हणजे मुळात प्रशांत दामले हे गोरा असल्याने ‘मद्रासी माणूस ‘ करताना त्यांच्या चेहरयावर काळा रंग फासायला लागायचा.

वैयक्तिक आयुष्यामध्येही १९८५ हे साल प्रशांत दामले याच्यासाठी खूप महत्वाचे ठरले. २७ डिसेंबर १९८५ रोजी प्रशांतच गौरी सोबत लग्न झालं. लग्नानंतर लगेचच २ दिवसांनी सलग तीन प्रयोग असल्याने त्यांना घराबाहेर पडावे लागले. “नवीन लग्न झालेले असूनही याची तक्रार माझ्या पत्नीने केली नाही. तिने वेळोवेळी दाखवलेल्या समजूतदारपणामुळेच मी इथपर्यंत येऊ शकलो.” असं ते म्हणतात. अभिनेता प्रशांत दामले सुरवातीला बेस्ट (बस) मध्ये टायपिंग विभागात काम करत होते. काम करत असताना ते काही नाटकांत देखील झळकत होते. हळूहळू नाटकांच्या प्रयोगाची संख्या वाढू लागली पण नोकरीतून वेळ काढून नाटक करणं अशक्य होत. शिवाय अभिनय क्षेत्र बेभरवश्याच त्यामुळे पत्नी देखील काम करत. त्यावेळी मोठी मुलगी ५ वर्षांची आणि दुसरी अवघ्या १ वर्षाची असताना पत्नीने “तू तुला हवं तेच कर मी घर सांभाळेल” असा खंबीर पाठिंबा दिला. मग बेस्ट मधून ५ वर्षांची बिनपगारी रजा घेतली. पत्नीने त्यावेळी दाखवलेल्या भरोसा इतका कामी आला कि लवकरच बेस्टला रामराम ठोकून नाटक, एकांकिका आणि चित्रपट यातून पैसा मिळवता आला.

प्रशांत दामले म्हणतात “आज माझ्या नाट्य प्रवासाला ४० वर्षे झाली. पण खरं सांगायचं तर सुरवातीला मी इथपर्यत पोहचेन कि नाही हे माहीत नव्हतं. पण मेहनत घ्यायची तयारी पूर्वीपासून होतीच. पण त्याच बरोबरी ने माझ्या कुटुंबियांचे सहकार्य, आप्तेष्टांच्या सदिच्छा आणि रसिकांनी भरभरून केलेल्या प्रेमामुळेच मी १२,५०० चा टप्पा पार करू शकलो. आजच्या दिवशी मागे वळून पाहताना , भूतकाळात डोकावताना अनेक व्यक्तींची , महत्वाच्या घटनांच्या आठवणी आल्याशिवाय राहत नाही.” अनेकांना हे माहित नसेल कि प्रशांत दामले यांच्या नावाने प्रशांत दामले फौंडेशन देखील आहे. ज्यात कॅन्सरच्या शेवटच्या स्टेजच्या लोकांसाठी नाटके ठेवतात तसेच आर्मी शोज , nda शोज, पेन्टींफ एक्सयूबुशन आणि स्पोकन इंग्लिश चे कलासेस हि घेतले जातात अनेक मुलामुलींना त्याचा उत्तम फायदा होऊन ते चांगल्या ठिकामी कामावर देखील रुजू झालेले आहेत.