news

ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांच्यावर हृदयाची शस्त्रक्रिया….सेलिब्रिटी विश्वात काळजी होतेय व्यक्त

प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांच्यावर नुकतीच एक शस्त्रक्रिया पार पडली आहे. डॉ मोहन आगाशे यांना गेल्या काही दिवसांपूर्वी अस्वस्थ जाणवू लागले होते तेव्हा त्यानी डॉक्टरांकडे धाव घेतली. यावेळी हृदयाची शस्त्रक्रिया करण्याचा त्यांना सल्ला देण्यात आला. नुकतीच त्यांच्यावर ही शस्त्रक्रिया पार पडली असून मोहन आगाशे यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. या बातमीमुळे मात्र सेलिब्रिटी विश्वात आणि मराठी प्रेक्षकांनी त्यांच्याबद्दल काळजी व्यक्त केली आहे. पण असे असले तरी स्वतः मोहन आगाशे यांनी समोर येऊन मी आता या संकटातून सुखरूप बाहेर पडलोय अशी माहिती दिली आहे.

mohan agashe photos
mohan agashe photos

हृदयावर शस्त्रक्रिया करतानाचा एक व्हिडिओ शेअर करत मोहन आगाशे म्हणतात की, “मी अजूनही तुमचे मनोरंजन करावे अशी डॉक्टरांची इच्छा होती , म्हणून त्यांनी माझ्यासोबत हेच केले. मी आता स्वस्थ आणि मनस्वी आहे! तुमच्या अखंड प्रेमाबद्दल धन्यवाद” असे म्हणत मोहन आगाशे यांनी त्यांच्या प्रकृती बद्दल माहिती दिली आहे. जगण्याची भयंकर इच्छाशक्ती असलेल्या मोहन आगाशे यांचे हे सकारात्मक मत पाहून अनेकांनी निश्वास टाकला आहे. पण अजूनही डॉक्टरांनी त्यांना काही दिवस विश्रांतीचा सल्ला दिला आहे. दरम्यान मोहन आगाशे यांनी मराठीसह हिंदी चित्रपटातून त्यांच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. या वयातही त्यांचा काम करण्याचा उत्साह तरुणांना लाजवेल असाच आहे.

mohan agashe marathi actor
mohan agashe marathi actor

‘आधे अधुरे’ या नाटकातून ते महत्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. पण आता काही दिवस प्रकृती अस्वास्थ्यामुळे या नाटकाला ब्रेक लागला आहे. जैत रे जैत चित्रपटात मोहन आगाशे यांनी साकारलेला मुख्य नायक ते चरित्र अभिनेत्याच्या भूमिका असा त्यांचा अभिनय क्षेत्राचा प्रदीर्घ प्रवास प्रेक्षकांनी अनुभवला आहे. त्यामुळे लवकरात लवकर ते या संकटातून सुखरूप बाहेर पडून प्रेक्षकांसमोर यावेत हीच प्रेक्षकांची इच्छा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button