serials

या अभिनेत्रीच छोट्या पडद्यावर कम बॅक…एक वर्षापूर्वी मालिकेतून काढता पाय घेतल्यानंतर दिसणार दमदार भूमिका

काही कलाकार हे त्यांच्या खाजगी कारणास्तव मालिकेतून अचानकपणे काढता पाय घेतात. तेव्हा सगळीकडे एकच चर्चा रंगलेली पाहायला मिळते. गेल्याच वर्षी प्रिया मराठेने तुझेच मी गीत गात आहे या स्टार प्रवाहवरील मालिकेतून काढता पाय घेतला होता. या मालिकेत ती मोनिकाची भूमिका साकारत होती. ही विरोधी भूमिका असल्याने अनेकदा तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. पण तरीही मालिका टीआरपीमध्ये असतानाही प्रियाने या मालिकेतून एक्झिट घेतली होती. तिच्या जागी तेजस्वीनी लोणारी हिने ही भूमिका शेवटपर्यंत निभावलेली पाहायला मिळाली. या मालिकेतून काढता पाय घेतल्यानंतर प्रिया मराठे नवीन प्रोजेक्टमध्ये दिसणार असे बोलले गेले. पण बऱ्याचदा ती तिच्या नवऱ्यासोबत आणि घर कामात वेळ घालवताना दिसली. पण आता एक वर्षानंतर प्रिया मराठे पुन्हा एकदा मालिकेतून दमदार कमबॅक करताना दिसणार आहे.

priya marathe in tu bhetashi navyane serial
priya marathe in tu bhetashi navyane serial

येत्या ८ जुलै पासून रात्री ९ वाजता ‘तू भेटशी नव्याने’ ही मालिका सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होणार आहे. या मालिकेतून प्रिया मराठे पुन्हा एकदा विरोधी भूमिका साकारणार आहे. सुबोध भावे आणि शिवानी सोनार यांची या मालिकेत प्रमुख भूमिका आहे. हे दोन्ही तगडे कलाकार असल्याने खलनायिका सुद्धा तेवढीच ताकदीची असायला हवी या विचाराने प्रिया मराठेला या भूमिकेबाबत विचारण्यात आले. तेव्हा तिनेही ही मालिका करण्यास होकार कळवला. तेव्हा आता सोमवारपासून तू भेटशी नव्याने या मालिकेत प्रिया मराठे पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर झळकताना दिसणार आहे. दरम्यान प्रिया मराठे हिने अनेक मालिकांमधून खलनायिका रंगवलेली पाहायला मिळाली आहे. त्यामुळे ती ही भूमिका सुद्धा तेवढ्याच ताकदीने उभी करेल यात शंका नाही. या नवीन मालिकेसाठी आणि दमदार भूमिकेसाठी प्रिया मराठेचे अभिनंदन.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button