marathi tadka

सारं काही तिच्यासाठी मालिकेतील श्रीनूची हि आहे खऱ्या आयुष्यातील ओवी… तुम्ही हिला ओळखलंत आहे खूपच प्रसिद्ध

झी मराठीवरील सारे काही तिच्यासाठी ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. मालिकेतील श्रीनू, ओवी आणि निशी यांच्या नात्यातील धमालमस्ती पाहण्यासाठी प्रेक्षकही तेवढेच उत्सुक असतात. ओव्या हळूहळू आता खोतांच्या घरात रुळू लागली आहे. निशीला ती वेळोवेळी मदत करताना दिसत आहे. एकीकडे श्रीनूची आई त्याचे लग्न निशीसोबत व्हावे म्हणून भावाला ती तशी मागणी घालताना पाहायला मिळाली. पण हा श्रीनू ओवीच्या प्रेमात पडल्याने मालिकेत रंजक ट्विस्ट आलेले पाहायला मिळणार आहेत. पण खऱ्या आयुष्यात हा श्रीनू ओवीच्या नव्हे तर रील स्टारच्या प्रेमात पडलेला पाहायला मिळत आहे. मालिकेत श्रीनूची भूमिका अभिनेता अभिषेक गावकर याने साकारलेली आहे.

Abhishek Gaonkar and sonalee
Abhishek Gaonkar and sonalee

अभिषेक कॉलेजमध्ये असताना नाटकातून काम करत असे. परळ येथी महर्षी दयानंद हे त्याचे कॉलेज. आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांमधुन तो नाटकाचे लेखन ,अभिनय तसेच दिग्दर्शन करू लागला. ब्रह्मास्त्र या एकांकिकेने त्याला प्रकाशझोतात आणले. रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या पहिल्या पर्वात तो एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकला होता. मालिकेत काम करत असतानाच तो प्रल्हाद कुडतरकला मालिकेचे लिखाण करण्यास साहाय्य करत होता. हंडरेड डेज, माझी माणसं, सुख म्हणजे नक्की काय असतं अशा मालिकांमधुन त्याने विविधांगी भूमिका साकारल्या. सारं काही तिच्यासाठी या मालिकेतून अभिषेकला प्रमुख भूमिका साकारण्याची संधी मिळाली. मालिकेत तो श्रीनिवास सावंत ही भूमिका साकारत आहे. श्रीनू ओवीच्या प्रेमात पडल्याचे दाखवण्यात आले आहे मात्र अभिषेकची खरी ओवी ही रीलस्टार आहे.

sonalee social media star
sonalee social media star

अभिषेक रील स्टार असलेल्या सोनाली गुरवच्या प्रेमात आहे. हे दोघेही गेली अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. रील स्टार श्रुतिक कोळंबेकरसोबत ती अनेकदा व्हिडीओ बनवत असते. सोनालीचे इन्स्टाग्रामवर ३ लाख ६ हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत. अभिषेक आणि सोनाली अनेकदा एकत्रित फिरायला देखील जात असतात. ते दोघे एकमेकांच्या प्रेमात आहेत हे मराठी सृष्टीतील अनेक सेलिब्रिटींना देखील ठाऊक आहे. त्याचमुलं त्यांच्या एकत्रित फोटोंवर सेलिब्रिटींच्या खास कमेंट्स पाहायला मिळतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button