serials

तो अभिनेता केवढा आणि त्या २ घी अभिनेत्री केवढ्या वयातील फरकामुळे … ट्रोलिंगबाबत अपूर्वा नेमळेकरने सोडले मौन म्हणते

कथानक चांगले असूनही कधी कधी मालिका एका वेगळ्याच कारणामुळे ट्रोल झालेली पाहायला मिळते. असेच काहीसे घडले आहे स्टार प्रवाहवरील “प्रेमाची गोष्ट” या मालिकेच्या बाबतीत. प्रेमाची गोष्ट या मालिकेत तेजश्री प्रधान, राज हंचनाळे आणि अपूर्वा नेमळेकर प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहेत. या तिघांना साथ देणाऱ्या शुभांगी गोखले, योगेश केळकर, संजीवनी जाधव, इरा परवडे यांच्याही दमदार अभिनयाचं मोठं कौतुक केलं जात आहे. एकीकडे कथानक आणि कलाकार उत्तम असूनही मालिका प्रेक्षकांना काहीशी रुचलेली दिसत नाही. याचे महत्वाचे कारण म्हणजे नयिकांपेक्षा नायकाचे वय खूप लहान वाटते. तेजश्री प्रधान आणि अपूर्वा नेमळेकर या दोघींनाही नायक शोभून दिसत नाही, तो दोघींपेक्षा वयाने खूपच लहान वाटतो अशी टीका या मालिकेच्या बाबतीत केली जात आहे.

premachi gostha marathi serial
premachi gostha marathi serial

राज हंचनाळे हा अवघ्या दोन मालिकेमुळे प्रकाशझोतात आला. तुझ्यात जीव रंगला मालिकेत तो सहाय्यक भूमिकेत दिसला होता. त्यानंतर तो जीवाची होतीया काहिली मालिकेतून प्रमुख भूमिकेत दिसला. राज हंचनाळे पेक्षा तेजश्री प्रधान गेल्या १५ वर्षांपासून मराठी सृष्टीत कार्यरत असलेली पाहायला मिळते तर तिथेच अपूर्वा नेमळेकर हिनेही २०११ साली आभास हा मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. त्यामुळे या दोघींचा अभिनय क्षेत्रातला अनुभव खूप वर्षांचा आहे त्यांच्या तोडीसतोड राज हंचनाळे यांच्याही अभिनयाचं कौतुक होताना दिसतं मात्र वयातील फरकामुळे तो नायिकांना शोभत नाही अशी टीका या मालिकेच्या बाबतीत केली जात आहे.

apurva nemlekar premachi gostha serial
apurva nemlekar premachi gostha serial

या ट्रोलिंगबाबत अपूर्वा नेमळेकरला विचारले असता तिने एवढेच म्हटले आहे की, ” हो मी अशा कमेंट्स वाचल्या आहेत. आमच्या दोघांच्या कामाचं लोक कौतुक करतात त्यामुळे काहींना आमची जोडी आवडली आहे तर काहींना ही जोडी विजोड वाटते. तेजश्री आणि मी आम्ही दोघीही राजपेक्षा मोठ्या दिसतो असं काहींचं म्हणणं आहे. पण मला सांगायला आवडेल की राज मी आणि तेजश्री आम्ही तिघेही एकाच वयाचे आहोत. तिघांचं वय सारखंच असल्याने आम्ही त्याच जोशाने एकत्र काम करत असतो. पुढे जाऊन लोकांचं हे मत नक्कीच बदलेल असा मला विश्वास आहे.” असे अपूर्वाचे म्हणणे आहे. दरम्यान स्टार प्रवाहवरची ही नवी मालिका अव्वल स्थान पटकावले अशी अपेक्षा होती मात्र ठरलं तर मग या मालिकेने याही आठवड्यात ही बाजी मारलेली पाहायला मिळते आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button