serials

बऱ्याच प्रतीक्षेनंतर या अभिनेत्याचे मालिकासृष्टीत पुनरागमन… जुई गडकरीचा बॉयफ्रेंड म्हणून आला होता चर्चेत

काही कलाकार हे छोटा पडदा गाजवत असताना चित्रपट सृष्टीकडे वळतात. त्यामुळे डेलीसोपच्या माध्यमातून हे कलाकार गायब होतात. पण आता बऱ्याच प्रतीक्षेनंतर छोट्या पडदा गाजवणारे कलाकार पुन्हा एकदा मालिकेकडे वळलेले पाहायला मिळत आहेत. अक्षय म्हात्रे हा देखील मराठी मालिका सृष्टीत हिट ठरला, श्रेयस तळपदे, सुबोध भावे, उमेश कामत, स्वप्नील जोशी यांनीही एक काळ मालिकेत काम केले होते त्यामुळे चित्रपट केल्यानंतर हे कलाकार पुन्हा एकदा छोटा पडद्दा गाजवताना दिसून आले. तर असाच एक अभिनेता जवळपास ८ वर्षानंतर मालिकेकडे वळलेला आहे. लवकरच नवरी मिळे हिटलरला या झी मराठीवरील मालिकेत किशोर जहागीरदारची एन्ट्री होत आहे.

navari mile hitlarla serial news
navari mile hitlarla serial news

सध्या या मालिकेत एजेच्या हळदीची तयारी सुरू आहे. अशातच आता किशोर या मालिकेत एन्ट्री घेणार आहे. ही भूमिका अभिनेता प्रसाद लिमये साकारणार आहे. तू जीवाला गुंतवावे या मालिकेनंतर जवळपास ८ वर्षाने प्रसाद पुन्हा एकदा मालिकेकडे वळला आहे. प्रसाद लिमये याने आजवर अनेक मालिका तसेच चित्रपटातून महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. पुढचं पाऊल या लोकप्रिय मालिकेत त्याने करण सरदेशमुख हे पात्र साकारले होते. नकळत सारे घडले, असावा सुंदर स्वप्नांचा बंगला अशा मालिकेनंतर प्रसाद चित्रपटाकडे वळला. मोगरा फुलला, व्हाट्स अप लग्न, बेधडक, फत्तेशीकस्त, दगडी चाळ २ या चित्रपटात तो रममाण झाला. पण आता जवळपास ८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर प्रसादला पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर महत्वाची भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे.

actor prasad limye in navari mile hitlarla news
actor prasad limye in navari mile hitlarla news

दरम्यान प्रसादच्या बाबतीत एक कॉन्ट्रोव्हर्सि पाहायला मिळाली होती ती म्हणजे प्रसाद आणि जुई गडकरी दोघेही एकमेकांना डेट करत असल्याची. अर्थात या दोघांनी पुढचं पाऊल या मालिकेतून एकत्रित काम केले होते. त्यामुळे या दोघांच्यात एक मैत्रीचे नाते तयार झाले होते. अनेकदा हे दोघे एकत्रित भेटत असत,मधल्या काळात सोशल मीडियावर या दोघांचे एकत्रित फोटो शेअर झालेले पाहायला मिळायचे. यावरून ते दोघेही प्रेमात असल्याचे बोलले जाऊ लागले. पण कालांतराने या केवळ चर्चाच राहिल्या त्यानंतर अशा चर्चांना कायमचा पूर्णविराम मिळाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button