news

गं कुणीतरी येणार येणार गं…प्रसिद्ध अभिनेत्रीचं थाटात पार पडलं डोहाळजेवण

मराठी मालिका सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री वेदांगी कुलकर्णी हिचे नुकतेच डोहाळजेवण पार पडले आहे. गं कुणितरी येणार येणार गं म्हणत वेदांगीने तिच्या पेंग्नन्सीची गोड बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे. वेदांगीने शेअर केलेल्या फोटोंवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. नोव्हेंबर २०२१ मध्ये वेदांगीने अभिषेक तिळगूळकर सोबत लग्नगाठ बांधली होती. लग्नानंतर वेदांगीने झी मराठीच्या सत्यवान सावित्री मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. पण आता आईपणाची चाहूल लागताच ती अभिनय क्षेत्रातून थोडीशी बाजूला झालेली आहे.

actress vedangi kulkarni tilgulkar photos
actress vedangi kulkarni tilgulkar photos

वेदांगी बद्दल सांगायचं झालं तर ती एक उत्तम अभिनेत्री तसेच नृत्यांगना आहे. विविध आंतरमहाविद्यालयीन नाट्य स्पर्धेत वेदांगीला उत्कृष्ट अभिनयाची पारितोषिकं मिळाली आहेत. आठ वर्षे नाट्यक्षेत्राचा तिला अनुभव होता. यातूनच पुढे साथ दे तू मला या स्टार प्रवाहच्या मालिकेत तिला पहिल्यांदा प्रमुख भूमिका साकारण्याची संधी मिळाली. सूर राहू दे, लाडाची मी लेक गं, कुसुम, छडा, लंडनच्या आजीबाई अशा नाटक, मालिकेतून ती महत्वपूर्ण भूमिकेत झळकली होती. डान्स महाराष्ट्र डान्स या रिऍलिटी शोमध्येही तिने सहभाग दर्शवला होता. Victorious dance academy या नावाने तिची डान्सची अकॅडमी आहे जिथे अनेक मुलींना तिने डान्सचे प्रशिक्षण दिले आहे.

actress vedangi kulkarni tendulkar dohale jevan photos
actress vedangi kulkarni tilgulkar dohale jevan photos

अभिषेक सोबत लग्नानंतर सत्यवान सावित्री या मालिकेत तिने प्रमुख भूमिका साकारली होती. तसेच शिवानी बावकर हिची प्रमुख भूमिका असलेल्या कुसुम मालिकेत ती महत्वपूर्ण भूमिकेत दिसली होती. पण आता नृत्य आणि अभिनय या क्षेत्रातून काही काळापुरता ब्रेक घेऊन घर संसारात रममाण होण्याचा तिने निर्णय घेतला आहे. प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात आईपणाचा अनुभव खूप खास असतो. त्याचमुळे आता वेदांगीला तिच्या होणाऱ्या बाळाचे वेध लागले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button