मनोरंजन क्षेत्रात योग्य वयात लग्न होणं ही गोष्ट खूप विरळ मानली जायची . कारण एक काळ असा होता जेव्हा कलाकारांना त्यांचे लग्न झालंय हे त्यांच्या चाहत्यांपासून लपवावे लागत होते. लग्न झालेल्या कलाकारांचा चाहतावर्ग कमी असायचा परिणामी काम मिळवण्यासाठी त्यांना मोठी धडपड करावी लागायची. बॉलिवूड सृष्टीत तर अनेक कलाकार वय झालं तरी लग्न करत नव्हते. नायिकेच्या बाबतीत ह्या गोष्टी विशेष पाहायला मिळायच्या. वयाच्या ३५ शी नंतर करिअर संपल्यानंतरच नायिका बोहल्यावर चढायच्या. पण आता काळ बदलला आहे तसे कलाकारांचे विचारही बदलत चालले आहेत. योग्य वयात लग्न करून सेटल व्हायचं अशीच विचारसरणी आता पुढे येऊ लागली आहे. म्हणूनच टीव्ही मालिका क्षेत्र असो किंवा चित्रपट क्षेत्र सर्वच माध्यमातून गाजलेले कलाकार त्यांच्या योग्य वयात लग्नगाठ बांधताना दिसत आहेत.
कोण आहे पारू मालिकेतील अभिनेत्रीचा पती? तो नक्की करतो तरी काय ?
पारू या मालिकेतील अभिनेत्री शरयू सोनवणे होणे हिने देखील एक वर्षांपूर्वीच लग्न केलं असल्याचा एक आश्चर्यकारक खुलासा केला आहे. झी मराठीच्या पारू या मालिकेत शरयू पारूची भूमिका साकारत आहे. याअगोदर तिने पिंकीचा विजय असो मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. गेल्याच वर्षाच्या अखेरीस शरयुने पिंकीचा विजय असो या मालिकेतून काढता पाय घेतला होता पण त्यानंतर तिने फिल्ममेकर असलेल्या जयंत लाडे सोबत साखरपुडा केला असल्याचे जाहीर केले. पण आता शरयुने तिच्या लग्नाचे फोटो शेअर करत सगळ्यांना आश्चर्यचकित केलं आहे. त्याला कारणही तसेच खास आहे. गेल्या वर्षी आजच्या दिवशी म्हणजेच ३ मे २०२३ रोजी शरयूने जयंत लाडे सोबत लग्न केलं असल्याचा खुलासा केला आहे. आज तिच्या लग्नाचा पहिला वाढदिवस आहे आणि या दिवसाचे औचित्य साधून शरयुने जयंत सोबत लग्न केलं असल्याचे जाहीर केले आहे.
लग्नाचे काही क्षण शरयुने चाहत्यांसोबत शेअर केले आहेत ते फोटो पाहून मात्र अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे. शरयूचे लग्न झालंय आणि आज तिने ही बातमी रिव्हील केली त्यामुळे सर्वचजण अवाक झाले आहेत. लग्नामध्ये शरयुने सफेद रंगाची थीम निवडली होती. त्यांच्या लग्नाचा राजेशाही थाट त्या फोटोमधून स्पष्टपणे जाणवत आहे. पण शरयुने तिचे लग्न चाहत्यांपासून का लपवून ठेवले हा प्रश्न आता तिला नक्कीच विचारण्यात येणार आहे. लग्नाच्या एक वर्षानंतर तिने ही गोष्ट का उघड केली यावर तिचं उत्तर काय असणार हे जाणून घेण्याची तिच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता नक्कीच असणार आहे. तूर्तास शरयू सोनवणे आणि जयंत लाडे या दोघांनाही लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.