news

नवरी मिळे हिटलरला मालिका अभिनेत्याला कन्यारत्न प्राप्ती… होतोय शुभेच्छांचा वर्षाव

नवरी मिळे हिटलरला या मालिकेत लीला आणि एजेच्या लग्नाची तयारी सुरू असतानाच लीला पळून जाते. गुंडांच्या तावडून निसटल्यानंतर एजेला त्याची चूक समजते आणि लीला सोबत लग्न करायला तो नकार देतो. पण आता हाच एजे अंतराची हरवलेली अंगठी शोधण्यासाठी लिलाच्या पुन्हा मागे लागला आहे. ही अंगठी एजेसाठी तेवढीच खास असल्याने लिलाकडून ती पुन्हा मिळवण्यासाठी आता तो काय प्रयत्न करतो हे पाहावे लागणार आहे. दरम्यान लीला आणि एजे विवाहबंधनात अडकतील तेव्हा अडकतील पण मालिकेतील एका अभिनेत्याला खऱ्या आयुष्यात कन्यारत्न प्राप्ती झाल्याने त्याचा हा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. हा अभिनेता आहे अजिंक्य दाते. अजिंक्य दाते याने नवरी मिळे हिटलरला मालिकेत विश्वरूपची भूमिका साकारली आहे. काल ३ मे रोजी मालिकेचे शूटिंग चालू असतानाच त्याला कन्यारत्न झाल्याची गोड बातमी कळली.

ajinkya date navari mile hitlarla actor
ajinkya date navari mile hitlarla actor

एका मुलीचा बाप झालो हे कळताच सेटवरून ताबडतोब तो आपल्या लेकीला भेटायला रवाना झाला. ही आनंदाची बातमी सांगताना अजिंक्य दाते म्हणतो की, “अरे चलो भाई फटाफट लाईटींग करो यार, विश्वरूपको निकलना है” असं म्हणत स्वतः त्यांच्या मागे लागत काम करून घेणारा आमचा लीड राकेश बापट मला लवकर निघता यावं म्हणून अख्ख्या सीनचं स्ट्रक्चर माझ्या सोयीने करणारी आमची डिरेक्शन टीम…@sunny_the_jugadu @chandrakant.gaikwad.9 निघताना सावकाश जा,फोन करत रहा असं ठणकावून सांगणारी माझी सहकलाकार मंडळी आणि प्रोडक्शन टीम हे सगळे का झटपट करत होते… काय झालं होतं.. असं कुठे जायचं होतं मला… तर कारण होतं आमच्या कुटुंबात दाखल होणाऱ्या नव्या मेंबरच्या एन्ट्रीचं… प्राचीला १ मे ला सकाळीच ६ वाजता चिंचवडच्या कामत हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट केलं(तशी तिची तारीख १९/२० मे दिली होती ) दिवसभरात काहीच घडलंच नाही… दुसर्‍या दिवशी २ मे ला मला शुटींगला जाणं भाग होतं कारण तिथेही एपिसोड ‘अडकले’ होते… पुण्याहून ठाण्यात स्टुडिओत पोहचल्यावरही सगळं लक्ष फोन कडेच होतं…सीन होत होते…बाहेर गरमी आणि माझं टेन्शन टॉपवर होतं…दुपारी साडेचार पाचच्या दरम्यान फोन आला आणि आमच्या मेव्हणीबाईंनी बायकोच्या लेबर पेनचा आवाज ऐकवला…

ajinkya date daughter news
ajinkya date daughter news

उरलंसुरलं आवसान गळून गेलं… आणि मग घडला तो सुरुवातीला लिहीलेला तो प्रसंग… मग शुटींग संपवून गाडीने जो निघालो तोच वाटेत फोन आला की “अभिनंदन… बाप झालास… मुलगी झाली” बास….त्यानंतर मी गाडी चालवत पोचलो की हवेवर तरंगत मला नाही माहित…. इतकं भारवून जाणं या आधी कधीच घडलं नव्हतं… फायनली जेव्हा पोहचलो आणि पोरीला बघितलं तेव्हा एकच फिलिंग होतं “और यहा मे पिघल गया” स्वतःला बेरड समजायचो… ‘आपन रडत नसतोय’ याचा उगाच माज करायचो पण तो खोटा आहे हेही कळ्ळं.. इतकं क्युट काहीतरी घडतंय आणि तेही माझ्या आयुष्यात यावर खरंच विश्वास बसत नव्हता… आम्हाला मुलगी झाली पण तिने आई, बाबा, आजी आजोबा, मावशी, मामा, आत्या, काका अशी बक्कळ नाती जन्माला घातली… आणि आणि आणि आज ३ मे… आमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस इतका खास कधीच होऊ शकत नाही…बायको… लयीच कम्माल गिफ्ट दिलंस… मोक्कार खुश आहे आपन… लव यु…@prachepacchghare.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button