सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोधून विनोदाचे अनेक हिरे घडले त्यांनी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. पण आता महाराष्ट्राची हास्यजत्रा मधून एक एक हिरे गायब होताना पाहायला मिळत आहेत. ओंकार भोजने, विशाखा सुभेदार, पंढरीनाथ कांबळी यांच्या जीडीलाच आता गौरव मोरेने देखील महाराष्ट्राची हास्यजत्रा मधून एक्झिट घेतली आहे. खरं तर गौरव मोरे सध्या सोनी वाहिनीच्या मॅडनेस मचाऍंगे या शोमध्ये दाखल झाला आहे. नुकताच या शोमध्ये त्याने भुलभुलैया चित्रपटातील राजपाल यादवने साकारलेला पंडितजी निभावला होता. याशिवाय बाहुबलीतील कालकेच्या भूमिकेत पाहून गौरव मोरेचे सगळ्यांनी कौतुक केले होते. पण आता गौरव मोरे हिंदी रिऍलिटी शो आणि चित्रपटात व्यस्त असल्याचे बोलले जात आहे. येत्या १४ जूनला गौरव मोरेचा ‘अल्याड पल्याड’ हा भयपट रिलीज होत आहे. चित्रपटाचे प्रमोशन, रिऍलिटी शो तसेच आगामी प्रोजेक्ट साइन केल्यामुळे गौरव मोरेला सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा शोला वेळ देणे कठीण झाले आहे.
पण कलाकार म्हटलं की त्याने नाविन्याचा शोध घेत राहिला पाहिजे म्हणूनच हायजत्रा मध्ये अडकून न राहता गौरव मोरे वेगवेगळ्या संधी शोधू लागला आहे आणि त्यात त्याला यश देखील मिळत आहे. याच कारणास्तव गौरव मोरेने हास्यजत्रा सोडत असल्याचे जाहीर केले आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा या सेटवरचा व्हिडीओ शेअर करताना गौरव मोरे भावुक होऊन म्हणतो की, ” आरा बाप मारतो का काय मी….ये बच्ची……रसिक प्रेक्षक आपण हया साध्या मुलाला खूप प्रेम दिलं. नाव दिलं सन्मान दिलात त्याबद्दल मी आणि माझा परिवार आपले कायम ऋणी आहोत.. मला सांगताना खूप वाईट वाटतय की मी गौरव मोरे आपल्या लाडक्या मालिकेतून म्हणजेच “महाराष्ट्राची हास्य जत्रा” मधुन आपला निरोप घेत आहे.
माझ्या कामातून कोणच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी त्या सगळ्यांची मनापासुन माफी मागतो. महाराष्ट्राची हास्य जत्रा सोडून अगदीच काही दिवस झाले आणि नवा शो घेऊन तुमच्या भेटीला आलो माध्यम सारखं राहिलं आणि तुमचं प्रेम देखील ! असं म्हणतात ना नव्या प्रवासाची गोष्ट और असते आणि म्हणूनच नव्या प्रवासात नव्या शो साठी तुमचा खंबीर पाठिंबा कायम असावा. नवा प्रवास सुरू झाला आणि यातून देखील तुमच्या सारख्या रसिक प्रेक्षकांचं खळखळून मनोरंजन करणार आहे म्हणून तुमचा आशीर्वाद आणि शुभेच्छा प्रेम असच राहू दे…