झी मराठीवर या प्रसिद्ध अभिनेत्याची एन्ट्री…लग्न होऊनही अभिनेत्री सोबत अफेअरमुळे आला होता चर्चेत

झी मराठी वाहिनीवर लक्ष्मी निवास ही नवीन मालिका प्रसारित होत आहे. या मालिकेत तुषार दळवी आणि हर्षदा खानविलकर मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. तर अभिनेत्री अक्षया देवधर, दिव्या पुगावकर, स्वाती देवल, मीनाक्षी राठोड, निखिल राजेशिर्के असे बरेचसे कलाकार मालिकेत महत्वाची भूमिका साकारताना दिसणार आहेत. तर बिग बॉस गाजवलेला अभिनेताही या मालिकेत जावयाची भूमिका साकारताना दिसणार आहे. खरं तर बऱ्याच प्रतीक्षेनंतर हा अभिनेता छोटा पडदा गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. हा अभिनेता आहे राजेश शृंगारपूरे.
राजेश श्रुंगारपुरे याने आजवर अनेक मराठी चित्रपट, मालिकांमधून मुख्य भूमिका साकारलेल्या आहेत. एवढंच नाही तर हिंदी मालिकांमधूनही त्याला मुख्य भूमिकांसाठी ओळखले जाते. नुकतेच त्याने पुण्यश्लोक अहिल्याबाई या हिंदी मालिकेत मल्हारराव होळकरांचे पात्र गाजवले होते. त्याअगोदर तो मराठी बिग बॉसच्या पहिल्या सिजनमध्ये पाहायला मिळाला होता. हा पहिला सिजन राजेश शृंगारपुरे आणि रेशीम टिपणीस यांच्या अफेअर मुळे चांगलाच चर्चेत राहिला होता. एकत्र बेड शेअर करणे रेशमची बाजू घेणे राजेशला तोंडघशी पडणारे ठरले होते. कारण या शोमुळे त्याचं खाजगी आयुष्य मात्र संकटात येईल असच सगळ्यांना वाटलं होतं. २००५ साली डिंपलसोबत लग्न बंधनात अडकल्यानंतरही राजेशचे बिग बॉसमधले हे वागणं प्रेक्षकांना खटकलं होत.

पण कालांतराने हा शो संपला आणि दोघेही नामानिराळे झाले असेही त्यांच्याबद्दल बोलले गेले. चार दिवस सासूचे या मालिकेमुळे राजेश शृंगारपुरे प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला. त्यावेळी उंच आणि देखणा हिरो अशी त्याची ओळख बनली होती. त्यानंतर राजेश हिंदी सृष्टीतही चमकला पण बिग बॉसमुळे तो चांगलाच चर्चेत राहिला होता. दरम्यान आता हिंदी मालिकेनंतर तो पुन्हा मराठी मालिकेकडे वळला आहे. झी मराठीच्या लक्ष्मी निवास मालिकेत त्याची दमदार भूमिका असणार आहे.