अक्षय केळकर याने अभिनित केलेली अबीर गुलाल ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. पण अवघ्या काही महिन्यातच या मालिकेला त्याला निरोप द्यावा लागला. बिग बॉसच्या शोमध्ये तो महेश मांजरेकर यांचा आवडता सदस्य म्हणून त्याची ओळख होती. मराठी बिग बॉसच्या सिजन ४ चा विजेता अक्षय केळकर याने त्याच्या रमला नुकतंच चाहत्यांच्या समोर आणलं आहे. बिग बॉसच्या घरात असताना अक्षय नेहमी त्याची गर्लफ्रेंड रमा बद्दल बोलताना दिसायचा. त्यामुळे त्याची रमा नक्की आहे तरी कोण? असा प्रश्न त्याला सतत विचारला जायचा.
शेवटी ‘आज मी रमाला समोर आणणार’ असे तो सकाळी पोस्ट करताना दिसला. त्याची ही रमा दुसरी तिसरी कोणी नसून प्रसिद्ध गायिका आणि गीतकार “साधना काकतकर” आहे, हे आता स्पष्ट झालं आहे. अक्षयच्या बहिणीच्या लग्नातही साधनाने हजेरी लावली होती. ‘दोन कटिंग ३’ या अक्षय केळकरच्या म्युजिक अल्बमसाठी साधनाने गीतकार, गायिका म्हणून काम केलं आहे. अक्षयची बहीण श्रद्धाची ती चांगली मैत्रीण आहे. गेली १० वर्षे एकत्र असलेल्या अक्षयची ही रमा आता चाहत्यांसमोर आल्याने दोघांवरही शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
येत्या एप्रिलमध्ये अक्षय साधनासोबत लग्न करणार असल्याचेही बोलले जात आहे. अक्षयने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे त्यात तो म्हणतो “तर ही माझी रमा…❤️ उद्या आम्हाला 10 वर्ष पूर्ण होतायत … म्हंटल एक दिवस आधीच सांगाव .. म्हणून … बापरे, फाइनली सांगतोय मी … पण काहीही झाल तरी i love you मी फक्त तुमचाच आहे ❤️❤️❤️🙏🏽आणि आता आम्हीही❤️❤️❤️🤭🤭🤭🥰🥰🥰 …