कलाकार मंडळी ही त्यांच्याच क्षेत्रातील कलाकारांशी लग्नगाठ बांधत असतात. एकमेकांना समजून घेता यावं म्हणून हे कलाकार अशाच जोडीदाराची निवड करताना दिसतात. मात्र संसार म्हटलं की कुठेतरी परिस्थिती बदलते आणि त्यांना घटस्फोट घेण्याची वेळ येते. सध्या झी मराठीच्या नवरी मिळे हिटलरला मालिकेतील एजे म्हणजेच अभिनेता राकेश बापट त्याच्या घटस्फोटित बायकोमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. राकेश बापट याने त्याच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात ही बॉलिवूड चित्रपटापासून केली होती.
त्यानंतर तो हिंदी मालिकांमध्येही महत्वाच्या भूमिकेत पाहायला मिळाला. यातूनच त्याची अभिनेत्री रिधी डोगरासोबत मैत्री झाली आणि २०११ मध्ये दोघांनी थाटात लग्न केले. पण कालांतराने संसारात काहीतरी बिनसलं आणि २०१७ मध्ये दोघेही कायदेशीररित्या विभक्त झाले. राकेश बापट गेल्या वर्षी ओटीटी वरील बिग बॉसमध्ये झळकला होता तेव्हा शमिता शेट्टी सोबत त्याचे नाव जोडले गेले. पण शो संपताच दोघांनी ब्रेकअप झाल्याची घोषणा केली. आता राकेशची एक्स बायको रिधी डोगरा एका मुलाखतीत राकेश बद्दल एक वक्तव्य करताना दिसत आहे. साबरमती या चित्रपटात रिधी महत्वपूर्ण भूमिकेत झळकली आहे.
या चित्रपटनिमित्त तिने मुलाखत दिली त्यात ती सांगते की, “मी माझ्या आयुष्यात अनेक संकटांचा सामना केला आहे. पण माझ्या या अडचणीत मला नेहमी मित्र भावाची मदत मिळाली आहे. मी सहसा माझ्या अडचणी कुणाशी बोलून दाखवत नाही पण माझा भाऊ अक्षय डोगरा नेहमी माझ्या पाठीशी उभा राहतो.माझ्या जवळचे काही खास मित्र मैत्रिणी आहेत, त्यांचाही मी सल्ला वेळोवेळी घेत असते. एकता कपूर सोबतही माझं मैत्रीचं नातं आहे. ती देखील मला माझ्या अडचणीत मदत करते. राकेश माझा एक्स नवरा असला आणि आम्ही गेल्या ७ वर्षांपासून वेगळे झालो असलो तरी मी माझ्या अडचणी त्याच्यासोबत शेअर करते. तो नेहमी माझी मदत करतो मी त्याला माझ्या सगळ्यात जवळचा मित्र मानते.”