serials

काव्यांजली मालिकेतील ही चिमुरडी आहे प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची लेक…वडील देखील हिंदी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते

कलाकारांची मुलं ही त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत अभिनय क्षेत्रात दाखल होत असतात. मराठी सृष्टीत तर अशी अनेक उदाहरणं तुम्हाला माहीत असतील. पण आता हिंदी सृष्टीत नाव कमावलेल्या अभिनेत्याची मुलगी थेट मराठी मालिकेत नाव कमवत आहे ही गोष्ट तुम्हाला नक्कीच आश्चर्यकारक वाटेल. पण हो यामागे तसेच काही खास कारण आहे. प्रसिद्ध अभिनेता शक्ती आनंद हा हिंदी मालिका सृष्टीतील एक प्रसिद्ध चेहरा म्हणून ओळखला जातो. प्रमुख नायक ते सहाय्यक भूमिका अशा माध्यमातून तो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पण अशाच एका हिंदी मालिकेतून काम करत असताना त्याची अभिनेत्री सई देवधर सोबत ओळख झाली. आणि प्रेमात पडल्यानंतर २००५ मध्ये त्यांनी मोठ्या थाटात लग्नगाठ बांधली.

sai and shakti anand daughter nakshtra anand
sai and shakti anand daughter nakshtra anand

सई देवधर ही श्रावणी आणि देबु देवधर या कलाकार दाम्पत्याची मुलगी. अर्थातच यामुळे सईने आईच्याच ‘लपंडाव’ चित्रपटातून बालकलाकार म्हणून काम केले. पुढे सईने हिंदी मालिकेत जम बसवलेला पाहायला मिळाला. मधल्या काळात पर्पल मॉर्निंग मुव्हीज या निर्मिती संस्थेतून तिने आईसोबत मिळून मराठी मालिकेची निर्मिती केली. सध्या कलर्स मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या काव्यांजली या मालिकेची निर्मिती त्या करत आहेत. याच मालिकेत काव्या आणि विश्वजितच्या मुलगी प्राचीचे पात्र दाखवण्यात आले आहे. ही भूमिका सई आणि शक्ती आनंद यांची लेक नक्षत्रा आनंद हिने साकारली आहे. नक्षत्राची ही अभिनित केलेली पहिलीच मराठी मालिका आहे. पण या मालिकेअगोदर सई देवधरने फादर्स डे टू यु या शॉर्टफिल्मची निर्मिती केली होती.

shakti anand wife sai deodhar anand
shakti anand wife sai deodhar anand

त्यात तिने तिच्या लेकीला पहिल्यांदा अभिनयाची संधी मिळवून दिली होती. नक्षत्रा ही एक गुणी मुलगी आहे, आई वडीलांप्रमाणे तिलाही अभिनय क्षेत्रातच करिअर करायचं आहे. यात तिला आजी श्रावणी देवधर यांचीही साथ मिळत आहे. मालिकेत नक्षत्राने प्राचीची भूमिका सुंदर वठवलेली पाहायला मिळत आहे. खूप कमी जणांना माहीत आहे की सई देवधरच्या मुलीचे म्हणजेच नक्षत्राचे पदार्पण मराठी सृष्टीत झालं आहे. सध्या ती बालकलाकार म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे पण भविष्यात ती आईसारखी निर्मिती क्षेत्रातही नशीब आजमावू शकते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button