शिक्षण घेऊन पुण्यात ३ वर्षांपासून चांगल्या पगारावर नोकरी केली… एका मित्राचा तो सल्ला ऐकला आणि आयुष्य बरबाद झालं
नमस्कार मी राकेश पाटील साताऱ्यात सिव्हिल इंजिनीरिंग करून ३ वर्षांपूर्वी पुण्यात नामांकित कन्स्ट्रॅक्शन कंपनीत कामाला लागलो. घरची परिस्थिती तशी चांगली मोठा भाऊ डॉक्टर असल्याने सहसा पैश्याची कमी भासली नाही. आई वडील शेती करतात मी पुण्याला चांगल्या कंपनीत नोकरीला लागलो म्हणून सगळेच खूप खूष होते पगारही उत्तम होता. पुण्यात १ बिचके फ्लॅट घेऊन एकटाच राहत होतो. कामातून तसा जास्त वेळ मिळत नसायचा सकाळी ९ ते संध्याकाळी ६ असा कामाचा दिनक्रम. काम आवडीचं होत स्टाफ देखील सपोर्ट करणारा होता त्यामुळे कामात मन लागत होत. हळूहळू ३ वर्ष निघून गेली चांगली सेविंग देखील झाली होती. घरचे लग्नासाठी मुलगी देखील पाहायला लागले होते. एक चांगली कार घ्यावी म्हणून एकदा वेळ काढून एका शोरूमला गेलो तिथेच एका जुन्या मित्राशी भेट झाली. तोही कार घायलाच आला होता. बाहेर येताच एका हॉटेलवर कॉफी प्यायला चल म्हणून तो मला तिकडे घेऊन गेला.
तो मित्र देखील आमच्या गावापासून थोड्या अंतरावच राहायचा शालेय जीवनापासून आम्ही एकमेकांना ओळखत होतो. कॉफी घेताना जुन्या गप्पा रंगल्या. पुण्यात काय करतो कस चाललंय इतक्या लवकर कार का घेतोय असे प्रश्न तो विचारू लागला. मग पुढे अचानक पैश्याने पैसा कसा कमवला जातो हे मला पटवून दयायला लागला. मी ३ वर्षात जवळपास ५ लाखांची सेव्हिंग केली होती पगारही चांगला होता म्हणूनच कार घेतोय असं त्याला सांगितलं आणि तिथेच फसलो. त्याने मला एका शेअर मार्केटिंग ऑफिसमध्ये येण्यास सांगितलं आज मी जे काही आहे ते शेअर मार्केटमुळेच आहे असं सांगितलं. मला शेअर मार्केट मधलं ज्ञान नाही हे त्याला समजलं होत. दुसऱ्याच दिवशी तो मला घेऊन त्या शेअर मार्केटच्या ऑफिसमध्ये घेऊन गेला. भलंमोठं ऑफिस अनेक लोक ऑफिसमध्ये काम करत होते. एकूणच सर्वकाही उत्तम असावं असाच भास होत होता. मित्राने ऑफिसचा साहेबांची ओळख करून दिली. सहज म्हणून भेट द्यायला गेलो आणि कसाकाय त्यांच्या जाळ्यात अडकलो देवच जाणे. १ लाख गुंतवले तर दरमहा १० हजार व्याज मिळणार होत हे पाहून मीही ३ लाख रुपये लावण्याचा निर्णय घेतला. (त्यांचं हे ऑफिस गेली ५ वर्ष तिथेच आहे ह्याची चौकशी मी केली होती) मुलाचं स्वतःच्या नावाने डिमॅट अकाउंट काढून आपणच शेअर खरेदी करून पैसे कमवायचे पण त्यासाठी तेवढा वेळ कुठंय आणि आपल्याला त्यातलं ज्ञानही नाही म्हणून हा निर्णय घेतला.
सुरवातीला ३ महिने ३ लाखांच्या हिशोबाने ३० हजार महिना अगदी पहिल्या तारखेलाच जमा झालेला पाहून आणखीन आणखीन जवळचे २ लाख देखील लावले. इतकंच नाही तर आपण तर त्याचे ५ टक्के ह्या हिशोबाने आणखीन २ मित्रांना प्रत्येकी २-२ लाख लावायला देखील लावले. पण पुढच्याच महिन्यात साहेब अमेरिकेला गेलेत त्यामुळे महिन्याला मिळणारे पैसे १५ दिवस लेट मिळणार असा मॅसेज त्यांनी सर्वाना पाठवला. पण १५ दिवसाचं काय तर महिना उलटून गेला तरीही साहेब अमेरिकेतच आहेत असं सांगण्यात येत होत. ह्या पूर्वी देखील अनेक लोकांना अनेक ब्रोकर कंपन्यांनी लुटलं हे मी ऐकलेलं होत न राहवून आता मी वारंवार ऑफिसला जाऊ लागलो साहेब कधी येणार ते कॉल रिसिव्ह कधी करणार असे प्रश्न विचारू लागलो. हळूहळू माझ्याप्रमाणेच अनेक लोक पैश्यांसाठी ऑफिसच्या फेऱ्या मारू लागले आणि तेंव्हा असं लक्षात आलं कि काही लोकांनी तर कोट्यावधी रुपयांनी गुंतवणूक केली होती. पुढे साधारण २ महिन्यांनी ज्याची भीती होती तेच झालं अचानक ऑफिसमधील कामगार देखील पसार झाले. रीतसर पोलीस कम्प्लेंट केल्या पण पोलीस अश्या कामांत आपल्यालाच दोशी ठरवतात आपणच विचारपूस न करता पैसे गुंतवलेले असतात हि माझीच चूक आहे हे मलाही ठाऊक होत पण पैसे मिळावेत हि आशा देखील होती. माझे मेहनतीचे पैसे बुडाले हे घरी सांगितलं तेंव्हा घरचे देखील रागावले पण त्याच इतकं दुःख झालं नाही. २ मित्रांनी माझ्या म्हणण्यावरून प्रत्येकी २ लाख गुंतवलेले त्यांचे फोन घेण्याची देखील मला आता हिम्मत होत नाही. सुशिक्षित असून देखील अडाण्यासारखं वागलो आणि पैश्यांच्या मोहात आंधळं झालो आपण फसले गेलो शिवाय माझ्यामुळेच आणखीन लोक देखील त्यात फसले हे सांगताना देखील हात थरथर कापतात. मित्रानो मेहनीतने कमावलेला पैसे चुकूनही माहित नसलेल्या गोष्टीत वाया घालवू नका त्यातून फक्त पश्च्याताप आणि दुःख वाट्याला येत.