serials

धक्कादायक ! झी वाहिनीला रामराम ठोकून हे कलाकार दिसणार कलर्स मराठीवर ….१० वर्षांनंतर आता केदार शिंदेनी दिली नवी संधी

झी मराठी वाहिनीने तब्बल दहा वर्ष “चला हवा येऊ द्या” सारखा शो प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी आणला. खरं तर या शोची नावाप्रमाणेच सगळीकडे हवा होती. अगदी देशविदेशातील दौरे असो किंवा बॉलिवूड चित्रपटांचे प्रमोशन असो सगळ्यांनाच या शोची भुरळ पडली होती. कलाकारांना आर्थिक स्थैर्यता मिळवून देण्याचे काम सुद्धा चला हवा येऊ द्या ने केले होते.मात्र गेल्या दोन ते तीन वर्षांपासून चला हवा येऊ द्या ला प्रेक्षकांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे वाहिनीने चला हवा येऊ द्या हा शो बंद करण्याचा निर्णय घेतला. अर्थात या निर्णयामुळे चला हवा येऊ द्या च्या सर्वच कलाकारांना धक्का बसला. अचानक आपलं काम बंद होणार हे पाहून कलाकारांनी पर्यायी मार्गाचा अवलंब स्वीकारला.

nilesh sable onkar bhojne and bhau kadam
nilesh sable onkar bhojne and bhau kadam

काहीच दिवसांपूर्वी निलेश साबळे या शोमधून बाहेर पडला त्यावेळी श्रेया बुगडे हिने या शोची धुरा सांभाळली पण आता निलेश साबळे चित्रपटाच्या आणि वेबसिरीजच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे आणि आरोग्याच्या कारणास्तव त्याने हा शो सोडला असे त्याने म्हटले होते. पण आता निलेश साबळेने शो सोडण्यामागचे कारण समोर आले आहे. चला हवा येऊ द्या नंतर आता कलर्स मराठी वाहिनीने त्याला एक नवीन संधी मिळवून दिली आहे. आम्ही येतोय असे म्हणत निलेश साबळे, भाऊ कदम आणि ओंकार भोजने हे तिघेही आता कलर्स मराठीच्या शोचा भाग बनणार आहेत. वाहिनीचे हेड केदार शिंदे कलर्स मराठीवर आणखी एक नवीन रिऍलिटी शो घेऊन येत आहे. वाहिनीने अजून या शो चे नाव गुलदस्त्यात ठेवले आहे. पण त्याच जोडीला त्यांनी या शोमध्ये नेमकं काय असणार याचा उलगडा केला आहे. पुन्हा एकदा निलेश साबळे, भाऊ कदम आणि ओंकार भोजने हे तिघेही या शोमधून प्रेक्षकांना हसवण्याचे काम करणार आहेत.

hastay na hasaylach pahije nilesh sable in colors marathi
hastay na hasaylach pahije nilesh sable in colors marathi

तेव्हा हा शो पाहण्यासाठी प्रेक्षक देखील नक्कीच उत्सुक असणार आहेत. तिघांचा शोमध्ये असलेल्या सहभागाची एक झलक वाहिनीने जाहीर केली आहे. यातून ओंकार भोजनेला देखील संधी मिळाल्याने प्रेक्षकांनी आनंद व्यक्त केला आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रामधून बाहेर पडल्यानंतर ओंकारच्या अभिनयाला वाव मिळावा असे काहीच घडत नव्हते. दरम्यान तो चित्रपटातून नायकाच्या भूमिकेत दिसला खरा पण त्याच्या विनोदाच्या शैलीला अनेकांनी मिस केलेले पाहायला मिळाले. पण आता त्याला या शोमध्ये महत्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार असल्याने त्याच्या चाहत्यांसाठी ही एक पर्वणीच ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button