marathi tadka

आई कुठे काय करते मालिका दुपारी २.३० ला पाहिली जाईल का?…प्रश्नावर अनिरुद्धची प्रतिक्रिया

आई कुठे काय करते ही मालिका जवळपास सव्वा चार वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. सुरुवातीपासूनच ही मालिका टीआरपीच्या रेसमध्ये टॉप पाचच्या यादीत नाव नोंदवताना दिसली होती. पण आता गेल्या १८ मार्चपासून मालिकेच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. गेल्याच आठवड्यात टीआरपी रेट दाखवण्यात आला तेव्हा आई कुठे काय करते ही मालिका ऑनलाइन सुद्धा पाहणारे प्रेक्षक असल्याचे दिसून आले. पण वेळेत बदल केल्यामुळे टीआरपी कमी होणार का अशी भीती वाटत होती. मालिकेच्या कलाकारांना देखील याची धाकधूक होती. स्वतः अनिरुद्ध म्हणजेच मिलिंद गवळी यांनाही याबद्दल शंका होती. पण नुकतेच त्यांनी या शंकेच निरसन केलेलं पाहायला मिळत आहे. मालिकेच्या टीआरपी बद्दल ते म्हणतात की, “आई कुठे काय करते” आता सोमवार ते शनिवार दुपारी अडीच वाजता. जवळजवळ सव्वाचार वर्ष आमची ही मालिका संध्याकाळी साडेसात वाजता यायची. ही मालिका इतकी लोकप्रिय होती की संध्याकाळी साडेसात वाजता असंख्य घरांमध्ये स्टार प्रवाह चॅनल लागलेला असायचं, या चार वर्षात मी असंख्य लोकांना भेटलो असंख्य कुटुंबांना भेटलो.

aai kuthe kay karte milind gawali and madhurani
aai kuthe kay karte milind gawali and madhurani

सगळ्यांचं हेच म्हणणं होतं की आमच्याकडे “आई कुठे काय करते” ही मालिका आवर्जून बघितली जाते, त्यावेळेला कुणीही दुसरं चॅनल लावत नाही , आयपीएल असलं तरी सुद्धा साडेसात वाजता “आई कुठे काय करते “ ही मालिका बघितली जायची, आता 18 मार्चपासून चा निर्णय घेण्यात आला की आमची ही मालिका संध्याकाळी साडेसात च्या ऐवजी दुपारी अडीच वाजता दाखवण्यात येईल, संध्याकाळची बघितली जाणारी मालिका दुपारी बघितली जाईल का असा एक मनामध्ये प्रश्न येत होता, पण आता दोन आठवडे झाले आणि मी ज्या ज्या लोकांना भेटतोय, त्यातल्या बऱ्याचशा बायका मला सांगतात की “आम्ही आता दुपारी मालिका बघायला सुरुवात केली आहे बर का “ ! मला ऐकून छान वाटलं. आणि माझ्या असं ही ऐकण्यात आलं आहे की दुपारच्या वेळेचा टीआरपी पण अतिशय चांगला आहे. मला असं वाटतंय ज्यांना ज्यांना ही मालिका आवडते आणि जे आवर्जून ही मालिका बघतात, त्यांच्यासाठी वेळेचं काही बंधन नाहीये, संध्याकाळी असो दुपारी असो किंवा मग हॉटस्टार वर असो बघणारे हे आवडीने बघतातच , मला खरंच स्टार प्रवाह चं ,राजनशाहींचं, नमिताचं, सतीश राजवाडे यांचं, दिग्दर्शकांच्या टीम्सचं, creative team चं माझ्या सहकलाकारांचं पूर्ण युनिटचं कौतुक करावसं वाटतं.

aai kuthe kay karte anirudh and arundhati
aai kuthe kay karte anirudh and arundhati

उत्तम काम करायची consistency, creative thinking, persistency, बऱ्याच लोकांना असं वाटलं होतं की ही मालिका खूप चालली आहे, आता अजून पुढे हे काय दाखवणार आहेत ? पण या मालिकेचा कलाकार म्हणून प्रत्येक वेळेला माझ्या हातात जेव्हा स्क्रिप्ट येते, स्क्रीन प्ले येतो, माझी स्वतःची काम करायची उत्सुकता वाढत जाते, आणि माणसांच्या आयुष्यावर आधारलेली गोष्ट , ही इतक्या लवकर कशी संपू शकेल , जसं आपल्या सगळ्यांचे आयुष्यामध्ये सतत काही ना काहीतरी घडत असतं, तसंच या देशमुख कुटुंबामध्ये interesting, unpredictable, आपली उत्कंठा आणि उत्सुकता वाढवणारा घडत असतं, आजही मला करताना तेवढीच मजा येते आहे . बरं ईथे बाहेर अतिशय ऊन वाढलेला आहे, 37\38 डिग्री आहे, तुमच्या इथे ऊन वाढलं असेल तर, तुम्ही पण सगळे काळजी घ्या भरपूर पाणी पीत जा, शक्यतो उन्हात जाऊ नका, अडीच वाजता स्टार प्रवाह वर “आई कुठे काय करते” बघा. “

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button