news

अगोदर नावं ठेवली आणि आता मागितली माफी…उमा भेंडे यांच्या सुनेला चाहत्यांकडून मिळाला असाही अनुभव

मराठी सृष्टीला लाभलेल्या सोज्वळ आणि सालस नायिकेपैकी एक म्हणून उमा भेंडे यांनी स्वतःची ओळख बनवली होती. आज त्या हयातीत नसल्या तरी त्यांचा मुलगा प्रसाद भेंडे हा सिनेमॅटोग्राफर म्हणून या इंडस्ट्रीत कार्यरत आहे. श्वेता महाडिक ही उमा भेंडे यांचा मुलगा प्रसाद भेंडे याची पत्नी. गुड्डन तुमसे ना हो पायेगा, बालिका वधू अशा हिंदी मालिका तसेच लोकमान्य हा मराठी चित्रपट तिने अभिनित केला आहे. आज उमा भेंडे यांची सून एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. श्वेता महाडिक तिच्या इन्स्टाग्रामवर नेहमीच काहितरी क्रिएटिव्ह गोष्टी पोस्ट करत असते. क्राफ्टिंग, डिझायनिंगची आवड असलेली श्वेता या कारणामुळे सोशल मीडियावर लोकप्रिय आहे. पण नुकतेच एका पोस्टमुळे तिला चाहत्यांकडून ट्रोल व्हावे लागले होते.

श्वेता महाडिक हिने “लिप फिलर” करत असल्याची एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. ‘आजचा दिवस खूप खास आहे आणि एक वेगळा अनुभव मी घेत आहे’ असे म्हणत तिने लिप फिलर केल्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. पण लिप फिलरमुळे श्वेताचा चेहरा विद्रुप दिसत असल्याचे तिच्या चाहत्यांनी म्हटले होते. तिचे फुगलेले ओठ पाहून ‘काय गरज होती’ अशीही प्रतिक्रिया तिला मिळत होती. तू आहेस तशीच चं दिसतेस ह्याची गरज नव्हती, तूला हे चांगलं दिसत नाही. असे तिला टोमणे देखील खायला मिळाले. पण यानंतर मात्र श्वेताने यामागचं गुपित उलगडलेलं पाहायला मिळालं. श्वेता नेहमी क्रिएटिव्ह आयडिया शेअर करत असते. चाहत्यांना एप्रिल फुल बनवण्यासाठी तिने आर्टिफिशिअल ओठ बनवले होते. जे लावून लिप फिलर केल्याचे जाणवत होते.

shweta mahadik fake lips
shweta mahadik fake lips

“बुरा न मानो आज १ एप्रिल है! मी पहिल्यांदाच कृत्रिम ओठ बनवले. यामुळे तुम्हाला नक्कीच हसायला आले असेल. ” असे म्हणत तिने कृत्रिम ओठ कसे बनवले याचा एक व्हिडिओ शेअर केला. पण यानंतर मात्र श्वेताच्या चाहत्यांनी तिची सोशल मीडियावर जाहीरपणे मागी मागितलेली पाहायला मिळाली. मी तुम्हाला नाही नाही ते ऐकवलं, आम्ही तुझ्याबद्दल खूप वाईट बोललो आम्हाला माफ कर असा माफीनामाच तिला चाहत्यांकडून मिळत होता. पण श्वेताची ही क्रिएटिव्हिटी पाहून अनेकजण अवाक झाले होते. लिप फिलर मुळे सौंदर्य बिघडले असे तिला सल्ले देण्यात येत होते. पण सत्य समोर येताच त्यांनी तिचं कौतुक देखील केलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button