serials

इंद्रायणी मालिकेतील सुशिला आत्या खऱ्या आयुष्यात आहे खूपच मॉडर्न… फोटो पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

कलर्स मराठीवरील इंद्रायणी ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेतील इंद्रायणीची हुशारी आणि तिला गोत्यात आणणारे नातलग यामुळे मालिका अधिकच रंजक झाली आहे. मालिकेत लवकरच एक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आनंदीच्या कारस्थानामुळे व्यंकू महाराजांची वाचा गेली असली तरी इंद्रायणीच मालकीण असल्याचं सत्य लवकरच समोर येणार आहे. व्यंकू महाराज यातून एक मार्ग काढत असून आनंदीच्या तावडीतून ते इंदूची सुटका करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मालिकेत हा ट्विस्ट काय असणार हे पाहणे रंजक ठरणार आहे. सांची भोयार हिने इंद्रायणीची भूमिका सुंदर वठवली आहे. त्याचप्रमाणे सुशीला आत्याचाही प्रेक्षकांना राग आहे.

apurva choudhari actress in indrayani serial sushila aatya
apurva choudhari actress in indrayani serial sushila aatya

सुशिला इंद्रायणीचा छळ करते तिला सतत त्रास देते. पण खऱ्या आयुष्यात या दोन्ही कलाकारांमध्ये एक छान गट्टी जमलेली आहे. सेटवर या दोघींची सतत माजमस्ती सुरू असते त्याचमुळे दोघींचेही सीन्स अतिशय उत्तम जमून आले आहेत. सुशिला आत्याची भूमिका अभिनेत्री अपूर्वा चौधरी हिने साकारली आहे. मालिकेत साधी सुधी दिसणारी अपूर्वा खऱ्या आयुष्यात मात्र खूपच मॉडर्न आहे. रंगभूमीपासून अभिनयाच्या कारकिर्दिला सुरुवात केलेल्या अपूर्वाने आशीर्वाद तुझा एकविरा आई, तुमची मुलगी काय करते,काय घडलं त्या रात्री, अगबाई सासूबाई, बाळूमामाच्या नावानं चांगभलं, माझ्या नवऱ्याची बायको अशा अनेक गाजलेल्या मालिकेतून अपूर्वाने छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेत.

indrayani serial actress apurva choudhari
indrayani serial actress apurva choudhari

मुंबईतून थिएटर आर्टस् जॉईन केल्यानंतर अपूर्वाला व्यावसायिक नाटकातून झळकण्याची संधी मिळाली होती. मराठी मालिकांसह तिने पावटोलॉजि, सर्च, निमा डेंझोगप्पा, एक थी बेगम,सेक्शन ३७५, हल्ला हो अशा हिंदी चित्रपटातही काम केलं आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात रोहित सोबत तिने मोठ्या थाटात लग्न केले होते. आजवर हिंदी चित्रपट मराठी मालिकेतून छोट्या मोठ्या भूमिकेत झळकणारी अपूर्वा आता इंद्रायणी मालिकेतून सुशिला आत्याची महत्वपूर्ण भूमिका साकारत आहे. तिच्या या यशस्वी प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button