९० च्या दशकात बनलेल्या दूरदर्शनवरील अनेक मालिका आजही रसिक प्रेक्षकांच्या चांगल्याच स्मरणात राहिल्या आहेत. सर्कस, मिस्टर योगी, रामायण, ब्योमकेश बक्षी या हिंदी मालिकांमध्ये मराठी कलाकारांची एक हिंदी मालिका खूप चर्चेत आली होती. देशाच्या पहिल्या महिला डॉक्टर डॉ आनंदीबाई गोपाळ यांच्या जीवनावर भाष्य करणारी ‘आनंदी गोपाल’ ही मालिका त्याकाळी खूप गाजली होती. या मालिकेची निर्मिती कमलाकर सारंग, टॅनि खोसला आणि जयंत धर्माधिकारी यांनी केली होती. तर मालिकेचे शीर्षक गीत आशा भोसले यांनी गायले होते. लालन सारंग , ज्योती सुभाष, श्रीकांत मोघे यांच्यासह अनेक जाणते मराठी कलाकार या मालिकेत झळकले होते.
या मालिकेत मुख्य भूमिकेत अजित भुरे झळकले होते तर भार्गवी चिरमुले हिने तरुणपणीची आनंदीबाई साकारली होती. मालिकेत बालपणीची यमुना जोशी म्हणजेच आनंदीची भूमिका बालकलाकार राजश्री जोशी हिने निभावली होती. मालिकेत झळकलेली ही बालकलाकार आज तब्बल ३४ वर्षाने काय करत असेल , कशी दिसत असेल याबद्दल तुम्हाला नक्कीच जाणून घेण्याची उत्सुकता असेल. चला तर राजश्री बद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात.. राजश्री जोशी हिने या मालिकेत यमुना म्हणजेच आनंदीची अतिशय सुंदर भूमिका साकारली होती. मालिकेमुळे राजश्री प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली होती. नया नुक्कड या आणखी एका मालिकेत तिने बालकलाकार म्हणून काम केले होते. राजश्रीचे बालपण मुंबईतच गेले. दादर येथील छबिलदास आणि किंग जॉर्ज या शाळेतून राजश्रीने तिचे शिक्षण घेतले आहे. पुढे तिने मुंबई युनिव्हर्सिटी मधून पदवीचे शिक्षण घेतले.
राजश्रीची बहीण धनश्री जोशी ही देखील अभिनेत्री आहे. व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणूनही तिने काम केले आहे. याशिवाय कल्याण मधील प्रसिद्ध ‘जोशी बाग’ची ती ओनर आहे. इथे वेगवेगळे इव्हेंट आयोजित करण्यात येतात. तसेच श्वानांसाठी पार्क म्हणून जोशी बाग डॉग पार्क ही कन्सेप्ट देखील त्यांनी सुरू केली आहे. राजश्रीने मात्र बालकलाकार म्हणून लोकप्रियता मिळवली पण आता तिने अभिनयातून ब्रेक घेऊन घर संसार सांभाळण्यावर भर दिला आहे. १३ डिसेंबर २००८ रोजी केदार निमकर यांच्याशी राजश्रीचा विवाह झाला. Audiogyan या पॉडकास्टवर जगभरातील अनेक क्रिएटिव्ह मान्यवरांच्या त्यांनी मुलाखती घेतल्या आहेत. कधीकाळी बालकलाकार म्हणून झळकलेली राजश्री अभिनय क्षेत्रात दाखल झाल्यास तिचे प्रेक्षक नक्कीच स्वागत करतील.