marathi tadka

तू चाल पुढं मालिका फेम अभिनेता ध्रुव दातार आणि अक्षताच्या लग्नविधींना सुरुवात… फोटो होत आहेत व्हायरल

मराठी सेलिब्रिटी विश्वात लगीनघाई सुरू झालेली आहे. लवकरच अभिनेत्री अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांचा लग्न सोहळा पार पडणार आहे. येत्या १८ नोव्हेंबर रोजी हे दोघेही विवाहबद्ध होत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे केळवण मोठ्या थाटात साजरे केलेले पाहायला मिळाले. अमृता आणि प्रसादच्या लग्नाअगोदर आता आणखी एक सेलिब्रिटी कपल विवाहबद्ध होत आहे. तू चाल पुढं मालिका फेम अभिनेता ध्रुव दातार आणि अक्षता तिखे यांच्या लग्नविधींना सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वीच या दोघांनी बॅचलर पार्टी साजरी केली होती. त्यावरून दिवाळीच्या अगोदर हे दोघे लग्न करणार हे निश्चित झाले होते. पण आता येत्या काही दिवसातच ध्रुव आणि अक्षताचा लग्नसोहळा पार पडणार आहे.

dhruv datar wedding photos
dhruv datar wedding photos

कारण त्यांच्या लग्नाच्या अगोदरच्या विधींना नुकतीच सुरुवात झालेली आहे. आज ध्रुवची सोडमुंज पार पडली. मुंजीनंतरचा एक विधी म्हणून सोडमुंज केली जाते. सोडमुंज केल्याशिवाय लग्न लावता येत नाही अशी एक परंपरा आहे. त्याचमुळे ध्रुव दातार लग्नाच्या बोहल्यावर चढण्यागोदर सोडमुंजचा विधी पार पाडताना दिसला. आता लवकरच त्यांची मेंदी आणि हळदीचा सोहळा देखील मोठ्या थाटात पार पडणार आहे. तू चाल पुढं या मालिकेतून ध्रुव दातार प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला आहे. ही त्याची पहिली वहिली टीव्ही मालिका याअगोदर त्याने मॉडेल म्हणून प्रसिद्धी मिळवली होती. तू चाल पुढं या मालिकेनंतर आता ध्रुव स्टार प्रवाहवरील ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेतून महत्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे.

dhruv datar and akshata tikhe
dhruv datar and akshata tikhe

तू चाल पुढं मालिकेत तो नकारात्मक भूमिकेत दिसला पण आता या नव्या मालिकेत तो नायकाच्या भावाची सहाय्यक भूमिका साकारणार आहे. तर ध्रुवची होणारी पत्नी अक्षता तिखे ही देखील उत्कृष्ट नृत्यांगना आहे. तिची स्वतःची डान्स अकॅडमी सुद्धा आहे. याशिवाय वेगवेगळ्या इव्हेंटसाठी ती कोरिओग्राफर म्हणूनही काम करताना दिसते. सेलिब्रिटींचे लग्न म्हटलं तो सोहळा कसा साजरा केला जातो याची उत्सुकता निर्माण होत असते. ध्रुवच्या लग्नात मराठी सृष्टीतील कोणकोणते सेलिब्रिटी हजेरी लावणार याचीही त्याच्या चाहत्यांना उत्सुकता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button