marathi tadka

मराठी सेलिब्रिटींच्या अटी पाहून प्रसिद्ध आयोजकाने पिळले कान…माझ्या ह्या ह्या अटी आहेत तरच मी येईन नाहीतर

कुठल्याही सण समारंभाला, उद्घाटनाला किंवा राजकिय कार्यक्रमांना सेलिब्रिटींना आमंत्रित केले जाते. हल्लीच्या जमान्यात हे फॅड राजकीय क्षेत्रात जरा जास्तच वाढलेलं पाहायला मिळतं आहे. आपला कार्यक्रम त्या नेत्यापेक्षा वरचढ कसा होईल याचाच अधिक विचार केला जातो. त्यामुळे कुठल्या सेलिब्रिटींला बोलवायचं याची जणू एक चढाओढच चालू असते. तेव्हा हे सेलिब्रिटी या प्रसिद्धीचा फायदा कसा करून घ्यायचा म्हणून वेगवेगळ्या प्रकारची मागणी करत असतात. सोबतच आयोजकांवर काही अटी सुद्धा लादण्यात येतात. मग मेकअप करायला व्हॅनिटी व्हॅनच हवी, राहायला फाइव्ह स्टार हॉटेलच हवे, कार्यक्रम स्थळी पोहोचायला ही ही गाडीच हवी अशा विविध मागण्या करत हे सेलिब्रिटी आपण कुणी मोठे आहोत याचा टेंभा मिरवतात.

swapnil raste ayojak
swapnil raste ayojak

मात्र सेलिब्रिटींच्या या अवास्तव मागण्या पाहून कार्यक्रमाच्या आयोजकांची पुरेवाट लागते. प्रसिद्ध आयोजक स्वप्नील रास्ते यांनी कलाकारांच्या याच मागण्या पाहून त्यांचे कण पिळणारी एक पोस्ट लिहिली आहे. स्वप्नील रास्ते हे गेली अनेक वर्षे कार्यक्रमांचे आयोजन करत असतात. सूत्रसंचालन असो किंवा निवेदन किंवा सेलिब्रिटी फोटोग्राफर अशा विविध भूमिकेतून ते प्रेक्षकांसमोर आलेले आहेत. त्यामुळे अनेक सेलिब्रिटींसोबत त्यांचा खूप चांगला परिचय आहे. याचाच एक भाग म्हणून ते राजकीय कार्यक्रमात सेलिब्रिटींना आमंत्रित करण्याचे काम करतात. नवरात्रीच्या दिवसात विविध ठिकाणी पार पडलेल्या कार्यक्रमात त्यांनी अनेक सेलिब्रिटींना आमंत्रण दिले होते. त्यातल्या काही सेलिब्रिटींची अवास्तव मागणी पाहून स्वप्नील रास्ते यांनी त्यांचे कान पिळण्याचा प्रयत्न केला आहे. ते म्हणतात की, “(कार्यक्रम पत्रिका छापून आल्यावर) मी सेलिब्रिटी आहे यार, माझ्या ह्या ह्या अटी आहेत, तरच मी येईन, नाहीतर कॅन्सल करू.

swapnil raste event manager
swapnil raste event manager

बरं! मी ही क्लाएंट आहे तुझा. माझ्या अटींचं काय? बरं, ह्या अटी आधी का नाही नमूद केल्या? कलाकार मित्रांनो, प्रत्येकाचा काळ हा मर्यादितच असतो. रहा की जमिनीवर आणि करा की काम. अमर्यादित काळ मनात घर करून राहाल, एक माणूस म्हणून सुध्दा!” स्वप्नील रास्ते यांच्या या मतावर मराठी सेलिब्रिटींनी देखील सहमती दर्शवली आहे. अभिनेत्री कश्मिरा कुलकर्णी, ओंकार कर्वे, भूषण तेलंग, दिग्दर्शक भूषण तांबे, गायिका मनीषा निश्चल यांनीही स्वप्नीलचे मत योग्य असल्याचे म्हटले आहे. स्वप्नील रास्ते यांनी एका युजरला आणखी एक प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, ” मला १०० पैकी ९५ लोकांचं सहकार्यच लाभलेलं आहे. पण कधी कधी आधीही आपल्यासोबत काम केलेले कलाकार अचानक असं वागू लागले आणि ती वेळ ही न बघता, तर थोडं वाईट वाटतं बाकी काहीच नाही. अटी शर्ती ह्या जरूर ठेवाव्यात पण त्या वेळच्या वेळी सर्व ठरवायच्या आधी ठेवल्या गेल्या हव्यात. असो, विषय फार मोठा नाही. २ दिवसांपूर्वी होऊन गेलेला आहे व client च्या सांगण्यानुसार सदर सेलिब्रिटी व्यक्तीची replacement करून कार्यक्रम ही पार पडला आहे.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button