serials

झी मराठीवरील दार उघड बये मालिकेने घेतला निरोप… अभिनेत्री फोटो शेअर करत भावुक होऊन म्हणते

झी मराठीवरील दार उघड बये या मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. सानिया चौधरी आणि रोशन विचारे यांच्या प्रमुख भूमिका होत्या. मुक्ता आणि सारंग या मालिकेच्या नायक नायिकेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले होते..त्याचमुळे ही पात्र प्रेक्षकांच्या जवळची वाटत होती. शरद पोंक्षे, सुहास परांजपे, किशोरी अंबीए, भाग्यश्री दळवी, माया जाधव, चित्रा खरे, किशोर चौघुले यांसारखी मातब्बर कलाकार मंडळी या मालिकेला लाभली होती. १९ सप्टेंबर २०२२ ला सुरू झालेल्या या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला होता. त्यानंतर आता एक वर्षाने या मालिकेने निरोप घेण्याचा निश्चय केला. अर्थात रोशन विचारे एका नव्या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणार आहे शिवाय शरद पोंक्षे देखील नाटकाच्या दौऱ्यांमध्ये व्यस्त आहेत.

daar ughad baye serial actors
daar ughad baye serial actors

त्याचमुळे मालिकेने आपला गाशा गुंडाळण्याचा निर्णय घेतला असे बोलले जात आहे. मालिकेची नायिका सानिया चौधरी हिने मुक्ताची भूमिका सुरेख वठवली होती. तिच्या अभिनयाचं खूप कौतुक करण्यात आलं. मुक्ताच्या भूमिकेने आपल्याला खूप काही दिलं असे म्हणत सानियाने मालिकेला निरोप दिला आहे. मालिकेच्या सेटवरच्या दोन गोष्टी सानियाने तिच्या सोबत नेल्या आहेत. त्या दोन गोष्टी कोणत्या हे सांगताना सानिया म्हणते की, ‘ मुक्ता ‘ चा वर्षभराचा अविस्मरणीय प्रवास आज संपला .उद्यापासून मुक्ता तुमच्या भेटीला नसेल… या कथेला जरी पूर्णविराम मिळत असला, तरी ‘मुक्ता ‘ माझ्यामध्ये कायमची सामावली गेली आहे. खंबीर ,बेधडक, अन्याय सहन न करणारी, पण तितकीच प्रेमळ ,गोड आणि हळवी ! आपली कला आणि नाती सुधा जीवापाड जपणारी मुक्ता !

sania chaudhari actress dar ughad baye
sania chaudhari actress dar ughad baye

जिने कलेवर जिवापाड प्रेम करणं नव्याने शिकवलं ….मुक्ताचे खूप खूप आभार ! मला मुक्ता साकारायला मिळाली म्हणून आणि प्रेक्षकहो तुमचे सुधा आभार, कारण तुमच्या प्रेमाने मला शेवटच्या भागापर्यंत त्याच उत्साहाने मुक्ता साकारण्याची ताकद दिली. संपूर्ण मालिकेत माझे सगळ्यात जास्त scenes shoot झाले ते संबळ आणि देवीआई सोबत ! मालिकेची सुरुवात मी संबळ वाजवत झाली आणि शेवट ही संबळ वाजवतच झाला ..यांना अंतर कसं देणार? म्हणून सेटवरुन माझ्या जिवाभावाच्या या दोन्ही गोष्टी : संबळ आणि देवी आई चा मुखवटा हक्काने माझ्या सोबत घरी घेऊन आले ….! आता त्या कायम माझ्याजवळ असतील आणि ‘मुक्ता’ कायम माझ्या मनात असेल …!! Thank you झी मराठी”.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button