news

फडणवीस यांच्या वक्तव्याचा अभिनेत्रीने घेतला खरपूस समाचार…. आम्हाला टोल पासून मुक्ती मिळाली हे त्यांचे विधानच

कलाकार मंडळी सामाजिक भान जपत वेगवेगळ्या गोष्टींवर आपले मत व्यक्त करत असतात..मग राजकीय विषय आव किंवा जास्तीचा टोल आकारला म्हणून त्याची वाच्यता करणे असो सोशल मीडियाच्या माध्यमातून ही मंडळी नेहमी आपले मत व्यक्त करत असतात. पण आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका वक्तव्याचा तेजस्विनी पंडित हिनेच खरपूस समाचार घेतलेला पाहायला मिळतो आहे. राज्यातील टोल नाक्याच्या मुद्द्यावरून मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी उपोषण केले होते. राज ठाकरे यांनी त्यांची भेट घेऊन हे उपोषण मागे घेतले गेले. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकार परिषदेत एक प्रश्न विचारण्यात आला.

tejaswini pandit and raj thackrey
tejaswini pandit and raj thackrey

तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी या पत्रकार परिषदेत उत्तर देताना म्हटले होते की, “आम्ही शिवसेना भाजपा युतीच्या काळात जी गोष्ट केली होती.त्यात राज्यातील सर्व टोलवर फोर व्हीलर आणि इतर गाड्यांना टोलपासून मुक्ती दिली होती. फक्त कमर्शियल आणि मोठ्या गाड्यांनाच आपण राज्यात टोल घेत होतो.” देवेंद्र फडणवीस यांचा हा व्हिडीओ पाहून तेजस्विनी पंडितने संताप व्यक्त केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत तेजस्वीनी पंडित राज ठाकरे यांना लक्ष घालण्याची मागणी करत आहे. हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर तेजस्विनी म्हणते की, “म्हणजेऽऽऽऽऽऽऽ ??????? ह्यांना कळतंय ना हे नेमकं काय बोलतायत ?? मग इतके वर्ष आम्ही जो टोल भरतो आहोत तो कुणाच्या खिशात जातोय ?

Tejaswini Pandit photos
Tejaswini Pandit photos

राजसाहेब तुम्हीच आता काय ते करा,महाराष्ट्राला वाचवा ह्या टोल धाडीतून !! हे “माननीय उपमुख्यमंत्री” यांचे विधान कसे असू शकते? अविश्वसनीय!!!” असे म्हणत ‘तुमचीही फसवणूक झाली असेल तर शेअर करा’. असे तेजस्विनी पंडित सोशल मीडियाच्या माध्यमातून राज ठाकरे यांना टॅग करताना म्हणत आहे. उपमुख्यमंत्री यांनी केलेले हे विधान साफ खोटे आहे आणि आम्हाला टोल पासून मुक्ती मिळाली हे त्यांचे विधानच अविश्वसनिय आहे. टोलपासून मुक्ती मिळालेली नसतानाही उपमुख्यमंत्री असे विधान कसे करू शकतात यातून ते आमची फसवणूकच करत आहेत असे म्हणत तिने राज ठाकरे यांना या प्रकरणी लक्ष घालण्याची मागणी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button