serials

मी कधीच सीरिअल पाहत नाही पण तुमची…. अशोक सराफ न चुकता पाहतात हि मालिका

मालिका म्हटलं की त्या कथानकाची सुसूत्रता जुळून येण्यासाठी ती रोज पहावी लागते. याबाबतीत महिला वर्ग हा नेहमी अग्रेसर ठरला आहे. पण याच महिलांमुळे घरातील पुरुष मंडळींना सुद्धा मालिका पाहण्याचे वेड जडते. अर्थात हा निर्णय त्यांना नाईलाजाने घ्यावा लागत असला तरी पुढे काय घडणार याचीही त्यांना उत्सुकता लागून राहिलेली असते. सेलिब्रिटी विश्वात कामाच्या व्यापामुळे बऱ्याचदा टीव्हीकडे दुर्लक्ष केले जाते. अशोक सराफ हे देखील त्यातलंच एक व्यक्तिमत्त्व म्हणावं लागेल. अशोक सराफ यांच्या पत्नी निवेदिता सराफ यांच्याकडून बऱ्याचदा अशा गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. अशोक सराफ हे कामाच्या बाबतीत अतिशय शिस्तबद्ध असतात. दुसऱ्या कलाकारांचे ते वेळच्यावेळी कौतुक करतात पण ते चुकले तर चांगली समजही देतात. ते जेव्हा छान झालं असं म्हणतात तेव्हा ते उत्तम झालेलं असतं याचा त्या उलगडा करतात.

rasika wakharkar with ashok saraf
rasika wakharkar with ashok saraf

त्यामुळे कलेचा मान ठेवणारी, असं गंभीर व्यक्तिमत्त्व असलेली ही व्यक्ती मालिका पाहत असेल यावर क्वचितच जणांचा विश्वास बसेल. सायली संजीव हिची मालिका तुम्हाला आठवत असेल..काहे दिया परदेस ही मालिका अशोक सराफ यांना खूप आवडायची. तेव्हापासून ते सायली संजीवला लेक मानू लागले होते. पण आताच्या घडीलाही अशोक सराफ एक मालिका आवर्जून पाहतात. ती मालिका म्हणजेच कलर्स मराठीची ‘ पिरतीचा वणवा उरी पेटला’ ही आहे. नुकतेच या मालिकेच्या सावी आणि अर्जुनने म्हणजेच अभिनेत्री रसिका वखारकर आणि इंद्रनील कामत यांनी अशोक सराफ यांची भेट घेतली.

ashok saraf with particha vanva uri petla actors
ashok saraf with particha vanva uri petla actors

तेजश्री प्रधानसह हे दोघेही अशोक सराफ यांच्या घरी गेले होते. तिथे त्यांच्या खूप गप्पाही रंगल्या. याचवेळी अशोक सराफ यांनी ही मालिका पाहत असल्याची कबुली दिली. “मी कधीच सीरिअल पाहत नाही..पण तुमची सीरिअल मी न चुकता बघतो” असे ते यावेळी म्हणाले तेव्हा रसिका आणि इंद्रनील दोघेही भारावून गेले होते. ” बास काय हवंय अजून? काल त्यांना पहिल्यांदा भरण्याचा , त्यांच्याशी गप्पा मारण्याचा आणि इतकंच नाही तर त्यांच्यासोबत आमच्या मालिकेचा एपिसोड बघण्याचा योग आला. ” असे रसिका यावेळी म्हणते. तेजश्री प्रधानने या सर्व गोष्टी जुळवून आणल्याने त्यांना अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांना जवळून भेटण्याची संधी मिळाली. याबद्दल रसिकाने तेजश्रीचे आभार मानले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button