news

इंडस्ट्रीत आमच्याबद्दल अफवा पसरवण्यात आल्या… एका झाडूवाल्याने मला त्या अवस्थेत पाहिलं

मराठी इंडस्ट्रीत कलाकारांना तासंतास एकत्रित काम करावं लागतं. कित्येकदा सेट लांब असेल तर कलाकारांना तिथेच राहावे लागते. त्यामुळे या कलाकारांमध्ये एक छान बॉंडिंग जुळून येते. पण या इंडस्ट्रीत असे एकत्रित काम करण्याचे बरेचसे तोटे देखील पाहायला मिळतात. अर्थात यामुळे तुमची बदनामी किंवा तुमचे नाव कोणासोबत जोडण्याचा धोकाही वाढत असतो. पण प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कलाकारांना या गोष्टीने फारसा काही फरक पडत नाही. असाच काहीसा अनुभव अभिनेत्री श्वेता मेहेंदळे आणि यश प्रधान यांनी घेतला आहे. श्वेता आणि यश हे झी मराठीच्या माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेपासून एकमेकांचे खूप चांगले मित्र बनले. या मालिके नंतरही त्यांची मैत्री आजही अबाधित आहे.

yash pradhan and shweta mehendale
yash pradhan and shweta mehendale

श्वेता मेहेंदळे बाईक रायडर आहे, तिने आजवर अनेक ठिकाणी ट्रिप केलेल्या आहेत त्यात यश प्रधानला देखील पाहायला मिळाले. त्यामुळे ते आजही त्यांची मैत्री जपताना दिसतात. पण याच मैत्रीमुळे त्यांच्या नात्यावर अनेकांनी शंका उपस्थित केली. मालिकेच्या सेटवर कित्येकदा हे दोघे एकत्रित वेळ घालवायचे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत यशने एक किस्सा शेअर केलेला पहायला मिळाला. इंडस्ट्रीत तीन गोष्टी नेहमीच चर्चेचा विषय असतात त्या म्हणजे क्रिकेट, गॉसिप आणि सेक्स. या तीन गोष्टी चघळण्यात इंडस्ट्रीला खूप मोठा इंटरेस्ट असतो. श्वेता आणि मी खूप चांगले मित्र आहोत. पण सेटवर आमच्याबद्दल अनेक अफवा ऐकायला मिळाल्या.

yash pradhan family with shweta mehendale family
yash pradhan family with shweta mehendale family

मी ज्या खोलीत झोपलेलो होतो त्याच खोलीत श्वेता सुद्धा झोपलेली होती. सकाळी एक झाडूवाला आला रूम साफ करण्यासाठी तेव्हा मी त्याला नेकेड सापडलो. तेव्हा आमच्याबद्दल गॉसिप सुरू झालं. का कुणास ठाऊक मला या गोष्टी ऐकायला आवडत नाहीत. मी हे गॉसिप ऐकलं तेव्हा मी माझ्या बायकोला फोन करून याबद्दल बोललो.अर्थात अशा काहीच गोष्टी नसल्याने आम्ही यावर फक्त हसत होतो. दिवसभर तुम्ही एक इमेज घेऊन फिरत असता. गंभीर, विनोदी असे खोटे भाव तुमच्या चेहऱ्यावर आणावे लागतात. पण मग इतर वेळीही तुम्ही तसे वागावं या मताचा मी नाहीये असे यश प्रधानचे स्पष्ट मत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button