news

गोविंदाने स्वतःच त्याचं करिअर संपवलं आहे… बॉलिवूडची दुसरी बाजू जाणून व्हाल अवाक

चंदेरी दुनियेचं वास्तव हे एक मृगजळासारखं आहे. या दुनियेची दुसरी बाजू कवचितच वेळा समोर आलेली पाहायला मिळते. खरं तर आताच्या घडीला हे सेलिब्रिटी स्वतःचं अस्तित्व मिरवण्यासाठी मीडियाला गाठीशी धरतात. ते स्वतःच मीडियाला फोन करून मी इथे इथे आहे अशी माहिती देतात. पण ज्यावेळी त्यांच्यासमोर कॅमेरा येतो तेव्हा मात्र ते या मिडियापासून दूर पळायला लागतात. काही दिवसांपूर्वी पापाराझिच्या वार्ताहराने दाक्षिणात्य कलाकारांचं वास्तव समोर आणलं होतं. ही लोकं फक्त कॅमेऱ्यासमोर नम्र वागतात पण प्रत्यक्षात ती तशी नसतात असे मत त्याने व्यक्त केले होते. तर प्रसिद्ध पत्रकार पूजा सामंत यांनीही या गोष्टींचा आता उलगडा केलेला पाहायला मिळतो आहे. मनोरंजन विश्वातील अगदी तीन पिढ्या पूजा यांनी समोर अनुभवल्या आहेत.

pooja samant on govinda life
pooja samant on govinda life

धर्मेंद्र, हेमामालिनीचं लव्ह मॅरेज ते विकी कौशलचं कतरिनासोबतचं लग्न यागोष्टींवर त्यांनी प्रकाश टाकला आहे. सुरुवातीला मोठ्या कलाकारांच्या मुलाखती घेणं सोपं होतं पण आता हे कलाकार मिडियामोर यायला धजा लावतात. शाहरुख सलमान हे तर मीडियाच्या प्रश्नांना उत्तरं देत नाहीत असाही खुलासा पूजा सामंत यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत केला आहे. गोविंदा सोबत पूजा सामंत यांनी अनेक मुलाखती केल्या. पण त्याने स्वतःच त्याचं करिअर संपवलं अशी धक्कादायक बाब त्या समोर आणतात. गोविंदा जेव्हा प्रसिद्धीच्या झोतात होता तेव्हा मात्र तो शूटिंगला खूप उशिरा पोहोचायचा. ९ चा कॉल टाइम असेल तर तो ४ वाजता पोहोचायचा. त्याच्या या वागण्यामुळे अनेक मोठमोठे कलाकार त्रस्त होते. मोठे सेलिब्रिटी त्याच्यासाठी ताटकळत वाट बघत बसायचे आणि तो निवांत त्याला हवं तेव्हा यायचा.

govinda real life story
govinda real life story

अनेकांची त्याच्याबद्दल ही तक्रार होती. त्यामुळे त्याचं करिअर संपुष्टात आलं असं पूजा सामंत म्हणतात. गोविंदाचे वडील ज्योतिषी असल्याने पूजा यांनी त्यांच्या वडिलांची भेट घेऊन मुलाखत घेतली होती. हे जेव्हा गोविंदाला समजलं तेव्हा त्यांनी त्या पत्रकाराचा शोध घेतला. तेव्हापासून पूजा सामंत सोबत गोविंदाचे सूर जुळून आले. अगदी कुणालाही पूजा माझी बहिण आहे अशी ओळख सांगू लागला. पण हाच गोविंदा जेव्हा त्याचा उतरता काळ अनुभवत होता तेव्हा त्याने मला मुलाखत देण्यासाठी टाळले होते. त्याच्या घरी तो पूजाला मुलाखत घेण्यासाठी बोलवायचा पण डिप्रेशनमुळे तो समोर येत नसायचा. तासंतास पूजा सामंत तशाच बसून असायच्या शेवटी निरोप आला की त्या निघून जायच्या. बॉलिवूडची ही काळी बाजू पूजा सामंत यांनी जवळून अनुभवली आहे. चेहऱ्यावर एक आणि मनात एक अशा अविर्भावात हे सेलिब्रिटी वावरत असतात अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button