अभिनय क्षेत्रातून बाजूला होऊन राजकारणाचा मार्ग स्वीकारलेल्या अभिनेत्रीचा तब्बल ८ वर्षेने पुन्हा अभिनयक्षेत्रात कमबॅक
बरेचसे कलाकार हे प्रसिद्धी मिळवल्यानंतर अभिनय क्षेत्रातून बाजूला होतात. काही जण राजकारणाचा मार्ग स्वीकारतात. अशातच गेली ८ वर्षे अभिनय क्षेत्रातून बाजूला झालेली प्रसिद्ध अभिनेत्री पुन्हा एकदा कमबॅक करताना दिसणार आहे. जत्रा, दुर्गा म्हणतात मला, मुंबईचा डबेवाला, सासर माझे दैवत, करायला गेलो एक, लाडीगोडी अशा चित्रपटातून कधी मुख्य भूमिका तर कधी सहाय्यक भूमिका साकारणारी अभिनेत्री दीपाली भोसले प्रेक्षकांना चांगल्याच परीचयाच्या आहेत. मराठी चित्रपट सृष्टीचा एक काळ त्यांनी नायिका म्हणून गाजवला आहे.
पण पैसा पैसा या २०१६ साली आलेल्या चित्रपटानंतर त्या अभिनय क्षेत्रातून जवळजवळ गायबच झालेल्या पाहायला मिळाल्या. २००८ साली त्या बॉबी खान सोबत विवाहबद्ध झाल्या. लग्नानंतरही त्या अभिनय क्षेत्रात सक्रिय राहिल्या पण मधल्या काळात त्यांनी राजकारणाची वाट धरली. समाजकारणात त्यांनी विविध उपक्रम राबवले. महिला कुस्तीपटूच्या त्या पाठीशी उभ्या राहिल्या. एवढंच नाही तर कोल्हापूर , कोकण पूर स्थितीत त्यांनी अनेकांना मदतीचा हात पुढे केला. त्यामुळे दीपाली भोसले सय्यद या राजकारणात स्वतःला झोकून देताना दिसल्या.
पण आता तब्बल ८ वर्षाने दीपाली सय्यद पुन्हा एकदा अभिनय क्षेत्रात कार्यरत झाल्या आहेत. एका आगामी चित्रपटासाठी त्यांना महत्वाची भूमिका मिळाली आहे. हा चित्रपट नेमका कोणता आहे याबद्दल त्यांनी कुठला खुलासा केलेला नाही. पण चेहऱ्यावर मेकअप करत त्यांनी या नवीन प्रोजेक्ट बद्दल एक हिंट दिली आहे. अर्थात या कमबॅक मुळे दीपाली सय्यद यांचे चाहत्यांनी स्वागतच केलेले पाहायला मिळत आहे.