धनुषने नयनताराला पाठवली १० कोटी रुपयांची कायदेशीर नोटीस … ३ सेकंदाची क्लीपमुळे नयनतारा आणि धनुष यांच्यातील वाद विकोपाला
दाक्षिणात्य सृष्टीत एक नवीन वाद चिघळला आहे. याबद्दल नोटीसद्वारे कलाकारांमधले वाद चव्हाट्यावर आले आहेत. दाक्षिणात्य अभिनेत्री नयनताराच्या जीवनावर आधारीत ‘नयनतारा: बियॉन्ड द फेयरी टेल’ ही डॉक्युमेंटरी नुकतीच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आली. डॉक्युमेंट्री रिलीज झाल्यानंतर नयनतारा हिने दाक्षिणात्य अभिनेता धनुषवर राग काढला आहे. नयनताराच्या डॉक्युमेंट्रीसाठी धनुषने त्याच्या ‘नानुम राउडी धन’ या चित्रपटातील क्लिपिंग्ज वापरण्याची परवानगी दिली नव्हती. त्यानंतर डॉक्युमेंट्रीमध्ये ३ सेकंदाची पडद्यामागची क्लिप वापरण्यात आली होती. या क्लिपच्या वापरामुळे धनुषने नयनताराला १० कोटी रुपयांची कायदेशीर नोटीस पाठवली होती. या कायदेशीर नोटीसमुळे नयनताराने तिचा राग धनुषवर काढला आहे.
अत्यंत कठीण शब्दांत ही टीका करताना नयनतारा धनुषला म्हणते की, “वडील आणि भावामुळे यशस्वी झालेल्या तुझ्यासारख्या यशस्वी अभिनेत्याने हे वाचून समजून घेण्याची गरज आहे. सिनेमा हा आपल्यासारख्या लोकांसाठी जगण्याचा लढा आहे, ज्याने कोणत्याही आशीर्वादाशिवाय स्वत:च्या गुणवत्तेवर इंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण केले आहे.” नयनताराने या पत्रात म्हटले आहे की, “नानुम राउडी धान चित्रपटाच्या गाण्याच्या क्लिप वापरण्यासाठी तिने धनुषच्या परवानगीची जवळपास २ वर्षे वाट पाहिली होती. जेव्हा धनुषने क्लिप आणि छायाचित्रे वापरण्याची परवानगी दिली नव्हती, तेव्हा तिने ती डॉक्युमेंटरी पुन्हा बनवली आणि पडद्यामागील क्लिपसह ती प्रसिद्ध केली.
“धनुषचा तो चित्रपट २०१५ मध्ये प्रदर्शित झाला, त्याला आता जवळपास १५ वर्षे झाली आहेत. तुम्ही चित्रपटाबद्दल सांगितलेल्या सर्व गोष्टी मी विसरलेलो नाही. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी तुम्ही सांगितलेल्या गोष्टींमुळे आमच्या मनावर कधीही भरून न येणाऱ्या जखमा झाल्या आहेत. चित्रपट ब्लॉकबस्टर झाल्यामुळे तुमचा अहंकार खूप दुखावला गेला आहे हे मला इंडस्ट्रीतील लोकांकडून समजले.” अशा कठीण शब्दात ती धनुषच्या निटीसीला उत्तर देताना दिसते. नानुम राउडी धान हा तमिळ चित्रपट आहे, जो २०१५ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन विघ्नेश शिवन यांनी केले होते. तर धनुषने चित्रपटाची निर्मिती केली होती. या चित्रपटात नयनतारा आणि विजय सेतुपती मुख्य भूमिकेत दिसले होते.