serials

कोण असेल ही विरोचकाची सावली? सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेत प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री

झी मराठीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी ह्या मालिकेत लवकरच एका नवीन पात्राची एन्ट्री होत आहे. देवीचं वरदान पाठीशी असलेली नेत्रा विरोचकापासून तिच्या कुटुंबाला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे . मालिकेत आतापर्यंत अशुभ घटना घडवून आणणाऱ्या रुपालीच्या मदतीला आता विरोचकाची सावली येणार आहे. नुकताच या मालिकेचा नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यात नवीन पात्राची एन्ट्री झालेली पाहायला मिळणार आहे. हे नवीन पात्र साकारणाऱ्या अभिनेत्रीला तुम्ही ओळखले असेलच. ही भूमिका साकारली आहे अभिनेत्री सुरुची अडारकर हिने. सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत सुरुचीची दमदार एन्ट्री झाली आहे.

तब्बल ८ वर्षाने ती झी मराठी वाहिनीवर पुनरागमन करत आहे. आजवर सुरुची अडारकर हिने सकारात्मक भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली होती. पण आता प्रथमच ती एका विरोधी भूमिकेतून प्रेक्षकांच्या समोर येत आहे. काही दिवसांपूर्वीच सुरुचीने अभिनेता पियुष रानडे सोबत लग्न करून चाहत्यांना मोठा धक्का दिला होता. त्यावरून तिला प्रचंड ट्रोलही करण्यात आलं होतं. पण हा लग्नाचा निर्णय आम्ही दोघांनी विचारपूर्वक घेतला होता असेही ती यावर म्हणाली होती. हे लग्न करून मी खूप खुश आहे असेच तिचे यावर म्हणणे आहे. त्यामुळे ट्रोल झालेल्या सुरुचीला सोशल मीडियावर मिळालेली प्रसिद्धी पाहून तिला पुन्हा एकदा झी मराठीने अभिनयाची संधी देऊ केली आहे.

actress suruchi adarkar in satvya mulichi satvi mulgi serial
actress suruchi adarkar in satvya mulichi satvi mulgi serial

या नवीन भूमिकेसाठी मी खूप उत्सुक आहे असे सुरुची तिच्या या नवीन भूमिकेबाबत सांगते. मुळात ही भूमिका विरोधी असल्याने तिच्यासमोर एक मोठे आव्हान आहे. या भूमिकेसाठी आपल्याला लोकांचा रोष सहन करावा लागणार हेही तिला चांगलेच ठाऊक आहे. दरम्यान हे नवीन पात्र मालिकेत आल्याने रुपालीसोबत तिचा काय संबंध असेल याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. त्यामुळे मालिका एका रंजक वळणावर येऊन ठेपलेली आहे. या नवीन भूमिकेसाठी सुरुचीचे अभिनंदन आणि या नवीन प्रवासासाठी शुभेच्छा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button