serials

माझ्या आयुष्यातील मी सगळ्यात मोठा डिसीजन घेतला आहे….म्हणून अभिनेत्रीने सोडली मुरंबा मालिका

स्टार प्रवाहवरील मुरंबा ही मालिका प्रेक्षकांची पसंती मिळवत आहे. त्याचमुळे मालिकेच्या एकेक कलाकारांची एक्झिट होत असल्याने प्रेक्षकांनी नाराजी दर्शवली आहे. काहीच दिवसांपूर्वी अभिनेत्री काजल काटे हिने या मालिकेतून एक्झिट घेतली होती. आरतीचा मृत्यू होतो त्यामुळे काजलला या मालिकेतून एक्झिट घ्यावी लागली होती. पण आता या मालिकेत जान्हवीचे पात्र मीरा सारंग साकारत असल्याने आम्हाला आधीचीच जान्हवी हवी अशी मागणी करण्यात येऊ लागली आहे. अर्थात जान्हवीच्या पात्राने प्रेक्षकांच्या मनात एक जागा बनवली होती त्यामुळे या भूमिकेत मीराला पाहून प्रेक्षक नाराजी व्यक्त करत आहेत. दरम्यान अभिनेत्री स्मिता शेवाळे हिने ही भूमिका सोडल्याने तिला परत येण्याची मागणी होऊ लागली आहे. तू मालिका का सोडली? असेही असंख्य प्रश्न तिच्या चाहत्यांकडून विचारण्यात येऊ लागले आहेत. तेव्हा स्वतः स्मिता शेवाळे हिने मालिका सोडण्याचे कारण सांगितले आहे.

smita shewale in muramba serial
smita shewale in muramba serial

खरं तर जान्हवी आणि आनंद यांच्या सिनला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला होता. पण आता स्मिता शेवाळे या मालिकेत नाही त्यामुळे मालिका रंजक वाटत नाही असे मत व्यक्त करण्यात येत आहे. स्मिता शेवाळे ही एक उत्तम अभिनेत्री आहे तिने चित्रपटातून प्रमुख नायिकेच्या भूमिका पासून अभिनयाच्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. आता सहाय्यक भूमिकेतही ती प्रेक्षकांची मनं जिंकून घेत आहे. पण एका मोठ्या कारणास्तव स्मिताने जान्हवीच्या पात्राला निरोप दिलेला पाहायला मिळतो आहे. माझ्या आयुष्यातील हा एक मोठा डिसीजन आहे असे ती या निर्णयाबद्दल म्हणते. स्मिता शेवाळे ही सिंगल मदर आहे. राहुल ओडक सोबत घटस्फोट झाल्याने ती तिच्या मुलासोबत वेगळी राहते. सध्या मालिकेनिमित्त स्मिता मुंबईत राहत होती. पण कबीर खूप लहान असल्याने त्याच्या पालनपोषणाची मोठी जबाबदारी तिच्यावर आहे. मालिकेमुळे २० दिवस शूटिंगला जावे लागते. त्यामुळे कबिरला वेळ देता येत नाही असे तिचे म्हणणे आहे.

smita shewale photos
smita shewale photos

याचमुळे मालिकेतून काढता पाय घेतस्मिता आता तिच्या मुलाला घेऊन पुण्यात राहायला आली आहे. स्मिताची आई पुण्यात असल्याने तिच्या घराजवळच ती राहायला गेली आहे. त्यामुळे आगामी वेबसिरीज आणि काही चित्रपटासाठी तिला वेळ देता येणार आहे. “आपल्या आयुष्यात असे काही निर्णय असतात जे परिस्थिती मुळे घ्यावे लागतात. कबिर खूप लहान असल्याने त्याला आई सांभाळू शकते आणि मी आगामी प्रोजेक्टमध्ये काम करू शकते या उद्देशाने स्मिताने या मालिकेला रामराम ठोकला आहे. अर्थात यामुळे मला कबिरलाही वेळ देता येईल कारण त्याचं हे जे वय आहे ते पुन्हा मागे नेता नाही येणार मला आता त्याला वेळ देणं गरजेचं आहे. आणि मला त्याचं बालपण गमवू द्यायचं नाही म्हणून मी ही मालिका सोडतेय असे स्मिताने स्पष्ट केले आहे. तर नवीन जान्हवीला प्रेक्षकांनी स्वीकारावं अशीही इच्छा तिने व्यक्त केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button